esakal | भारतातील टॉप 10 अब्जाधीश; पूनावाला यांच्या संपत्तीत वाढ
sakal

बोलून बातमी शोधा

forbes_20mukesh_20ambani

 2020 पासून जगासह देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा फटका बसला. असे असले तरी देशातील सर्वाधिक श्रीमत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे.

भारतातील टॉप 10 अब्जाधीश; पूनावाला यांच्या संपत्तीत वाढ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली-  2020 पासून जगासह देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला यामुळे मोठा फटका बसला. असे असले तरी देशातील सर्वाधिक श्रीमत व्यक्तींच्या संपत्तीमध्ये वाढ पाहायला मिळाली आहे. शिवाय देशातील अब्जाधीशांची संख्याही वाढली आहे. 2020 मध्ये अब्जाधीशांची संख्या 102 वरुन 140 पर्यंत वाढली. या अब्जाधीशांची एकूण संपत्ती तब्बल 596 अब्ज अमेरिकी डॉलर आहे.  मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये कोरोना महामारीच्या काळातही वाढ झालीय. ते आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती असून त्यांची संपत्ती 84.5 अब्ज डॉलर आहे. गौतम अदानी ये भारतातील दुसरे सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती ठरले असून त्यांची संपत्ती 50.5 अब्ज डॉलर आहे. फोर्ब्सने यासंदर्भातील यादी जाहीर केली आहे. भारतातीय 10 सर्वात श्रीमंत व्यक्ती पुढीलप्रमाणे


1. मुकेश अंबानी(  84.5 अब्ज डॉलर)

-कोरोना महामारीच्या काळातही मुकेश अंबानी यांनी विविध माध्यमातून फंड गोळा केला. त्यांनी 2021 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रिवर असणारे कर्ज शुन्यावर आणले. त्यांनी जीओमधला काही भाग विकला. यातून त्यांनी मोठा फंड गोळा केला आहे. 

2. गौतम अदानी (50.5 अब्ज डॉलर)

- अदानी यांनी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळातील 74 टक्के भागिदारी मिळवली आहे. शिवाय अदानी ग्रीन एनर्जीमधील 20 टक्के भाग विकून त्यांनी 2.5 अब्ज डॉलर मिळवले होते. 

3. शीव नादर (23.5 अब्ज डॉलर)

-शिव नादर यांनी मागील वर्षी जूलै महिन्यात HCL Technologies च्या प्रमुखपदावरन पायउतार होण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्यानंतर त्यांची मुलगी रोशनी नादर मल्होत्रा यांनी ही जबाबदारी संभाळली आहे. 

4. राधाकिशन दमानी (16.5अब्ज डॉलर)

-रिटेलिंग किंग राधाकिशन दमानी अॅव्हेन्यू सुपरमार्केट चेन अंतर्गंत देशात एकूण 221 DMart चालवतात. 

5. उदय कोटक (15.9 अब्ज डॉलर)

-देशातील सर्वाधिक श्रीमंत बँकर उदय कोटक यांनी कोटक महिंद्रा बॅंकेची स्थापना केली होती. ही देशातील चौथी सर्वात मोठी खासगी क्षेत्रातील बँक आहे. मागिल वर्षी जूनमध्ये कोटकने 95.0 लाख डॉलर्स किंमतीचे शेअर विकले होते. 

6. लक्ष्मी मित्तल (14.9 अब्ज डॉलर)

7. कुमार बिर्ला ( 12.8 अब्ज डॉलर)

8. सायरस पुनावाला (12.7 अब्ज डॉलर)

9. दिलीप संघवी (10.9 अब्ज डॉलर)

10. सुनिल मित्तल अँड फॅमिली (10.5 अब्ज डॉलर)

loading image