

Services Sector Lifts India’s Exports to All-Time High of $863 Billion
sakal
नवी दिल्ली : सेवा क्षेत्रातील नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर भारताच्या एकूण निर्यातीने २०२५-२६ या आर्थिक वर्षात ८६३.११ अब्ज डॉलरचा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. मागील वर्षी ही निर्यात ८२५.२६ अब्ज डॉलर इतकी होती. वाणिज्यिक गुप्तचर आणि सांख्यिकी महासंचालनालय (डीजीसीआय अँड एस) आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.