coronavirus updates: देशात सलग 8 दिवस आढळले 60 हजारांपेक्षा अधिक रुग्ण! 

corona, covid 19
corona, covid 19

कोरोनाचा (corona) कहर भारतासह जगभरात वाढतच आहे.  भारतात 15 ऑगस्टला लस येईल आणि कोरोना कायमचा संपेल आशा अफवा समाज माध्यमांवर प्रमाणात पसरत होत्या. पण त्याचा काहीही उपयोग झालेला दिसत नाही. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोच आहे.  काल वाढलेल्या कोरोनाच्या नवीन  63,986 रुग्णांमुळे भारतातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 25,89,208 पर्यंत पोहचला आहे. यामुळे आता भारत जगातील  सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. काल एका दिवसात देशात  कोरोनाच्या 950 रुग्णांचा मृत्यु झाला, त्यामुळे भारतातील एकून कोरोना रुग्णांच्या मृत्युचा आकडा 50 हजारांच्या वर गेला आहे. 

11 ऑगस्टचा अपवाद वगळता भारतात 7 ऑगस्टपासून प्रत्येक दिवशी 60 हजारांच्या वर कोरोनाचे नवीन रुग्ण मिळाले आहेत. सध्या देशात कोरोनाने महाराष्ट्र (560126), तामिळनाडू (326245), आंध्रप्रदेश (264142), कर्नाटक (203200), दिल्ली (150000)  या पाच राज्यांना जास्त नुकसान पोहचवले आहे. सध्या मिझोरम हे भारतातील एकमेव  राज्य आहे, जिथला कोरोना रुग्णांचा आकडा 1000 च्या वर गेला नाही. तसेच लक्षद्वीपमधे अजुनपर्यंत एकही कोरोनाचा रुग्ण सापडला नाही. दिलासादायक बाब म्हणजे भारतातील कोरोना रुग्णांचा बरा होण्याचा टक्का 71.61 पर्यंत पोहचला आहे. यामुळेच भारतात आतापर्यंत 18 लाख रुग्ण बरे झाले आहेत. 

काल लाल किल्ल्यावर झालेल्या  भाषणात पंतप्रधान मोदींनी कोरोनावरील लस लवकरच बाजारात येईल असं सांगितलं होतं. सध्या भारतात कोरोनावरील लशींवर तीन ठिकाणी काम चालू आहे. यामध्ये भारत बायोटेक, झायडस कॅडीला आणि पुण्यातील सिरम या संस्थांचा सामावेश होतो. या लशी सध्या मानवी चाचणी टप्प्यात आहेत. जेंव्हा या लशींना संशोधका ग्रीन सिग्नल देतील तेंव्हापासून लगेच या लशींचं उत्पादन सुरू केलं जाईल. तसेच ही लस प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहचवण्यात येईल, असंही पं. मोदी कालच्या भाषणात म्हणाले होते. तसेच कालच्या भाषणात मोदींनी भारतातील सर्व कोरोनायोद्ध्यांची स्तुती करुन त्यांचे आभारही मानले होते. सध्या जगभरातही कोरोना मोठं थैमान घालतच आहे. जगभरातील कोरोना झालेल्या रुग्णांचा  आता आकडा 2 कोटींच्या वर जाऊन 7,60,213 लोकांचा मृत्यु झाला आहे. अमेरिका (5335398) आणि ब्राझील (3275520)  नंतर भारत सध्या कोरोनाच्या आकडेवारीत 3 नंबरवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com