esakal | Big Breaking:धोनीची निवृत्तीची घोषणा
sakal

बोलून बातमी शोधा

ms dhoni retired announcement from instagram

महेंद्रसिंग धोनी हा एकमेव असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकल्या आहेत.  भारताने धोनी कर्णधार असताना टी20 वर्ल्ड कप, आयसीसी वर्ल्ड कप 2011 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

Big Breaking:धोनीची निवृत्तीची घोषणा

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

मुंबई : भारताला आयसीसीच्या तिन्ही क्रिकेट स्पर्धांचं विजेतेपद मिळवून देणारा माजी कर्णधार एम. एस. धोनी याने आज क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. जगातला बेस्ट फिनिशर म्हणून धोनीचा उल्लेख केला जातो. श्वास रोखून धरायला लावणाऱ्या अनेक सामन्यांमध्ये धोनीनं सिक्सर मारून, भारताला विजय मिळवून दिले आहेत. 2011मध्ये वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात त्यानं खेचलेला षटकार, तमाम भारतीयांच्या स्मरणात कायम राहील. 
 
महेंद्रसिंग धोनी हा एकमेव असा कर्णधार आहे ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकल्या आहेत.  भारताने धोनी कर्णधार असताना टी20 वर्ल्ड कप, आयसीसी वर्ल्ड कप 2011 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे.

loading image
go to top