Airport: मर्यादित उड्डाणांत पक्ष्यांच्या धडकांचा अडथळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

take off

Airport: मर्यादित उड्डाणांत पक्ष्यांच्या धडकांचा अडथळा

नवी दिल्ली : कोरोना निर्बंधांमुळे गेल्या वर्षी विमानांची उड्डाणे मर्यादित होऊनही पक्षी आणि प्राण्यांच्या उपद्रवात वाढ झाली. गेल्या वर्षी विमानांना पक्ष्यांच्या धडका २७.२५, तर प्राण्यांच्या धडका ९३.३३ टक्क्यांनी वाढल्या.

नागरी उड्डाण महासंचालनालयाने (डीजीसीए) यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली आहे. त्यानुसार पक्षी व प्राण्यांच्या धडकाच विमानांच्या कार्यवाहीसमोरील सर्वाधिक घातक धोका ठरला आहे. ही वाढ २०२०च्या तुलनेत आहे. २०१९चा निकष लावल्यास हे प्रमाण अनुक्रमे १९.४७ आणि १२३ टक्के इतके आहे. निर्बंधांमुळे वाहतूक कमी झाल्याने विमानतळांवरील वातावरण शांत होते. त्यामुळे हे प्रमाण वाढल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मे २०२१ मध्ये स्थानिक प्रवाशांची संख्या केवळ २१ लाख १५ हजार होती, तर एप्रिल-जूनमध्ये केवळ दहा टक्केच आंतरराष्ट्रीय उड्डाणे झाली.

२०१९ मध्ये उरल एअरलाईन्सच्या मॉस्को-समिमफेरोपोल विमानाच्या इंजिनाला सागरी बगळ्यांच्या (सीगल्स) थव्याने धडक दिली. त्यामुळे आणीबाणीची स्थिती निर्माण होऊन हे विमान मॉस्कोतील शेतात उतरविणे भाग पडले. यात ७४ प्रवासी जखमी झाले.

मुख्य कारणे

 • विमानतळांच्या परिसरात होणारे नागरीकरण

 • सांडपाणी, कचऱ्याचे अयोग्य व्यवस्थापन

 • विनातळांजवळील कसायांची दुकाने

 • परिसरातील उघडी गटारे

 • अशा कारणांमुळे पक्षी किंवा प्राणी खाद्य तसेच पाण्यासाठी आकर्षित होण्याच्या प्रमाणात वाढ

विमानतळ प्राधिकरणाच्या उपाययोजना

 • पक्ष्यांना रोखण्यासाठी झोन गन, लेसर टॉर्च, साऊंड रिपेलंट डिव्हाईस, रिफ्लेक्टीव टेप्स अशा उपकरणांचा वापर

 • विमानांच्या कार्यवाहीच्या क्षेत्रातील जमिनीचे सपाटीकरण

 • तेथील गवत, झाडेझुडपे नियमितपणे कापणे

 • कीटकनाशकांची नियमित फवारणी

 • उंदीर, घुशी मारण्याची यंत्रणा कार्यान्वित

 • कचरा बंदिस्त जागेत टाकणे

 • गटारांवर जाळ्या

 • अधिकाऱ्यांसाठी माहितीपर कार्यशाळांचे आयोजन

 • जमिनीवरील उघड्या असलेल्या मोकळ्या जागांचे प्रमाण कमी करणे

 • विमानतळाच्या परिसरातील गवताची उंची १५ ते २० सेंटीमीटर इतकीच ठेवणे

 • पक्ष्यांची घरटी आणि अंडी नियमितपणे गोळा करणे

 • विमानतळाभोवती असलेल्या कुंपणाच्या भिंतीमधील भगदाडे नियमितपणे बुजविणे, जेणेकरून रानमांजर, कोल्हा, साप तसेच इतर छोटे प्राणी आत येणार नाहीत

 • धावपट्टीजवळील चिन्हे आणि खांबांवर खिळे असलेली उपकरणे बसविणे

 • स्थानिक महापालिकेच्या समन्वयाने लगतच्या परिसराची नियमित तपासणी

 • हवाई क्षेत्र पर्यावरण व्यवस्थापन समितीसह समन्वय

कबुतरांबाबत खास उपाय

ब्लू रॉक पिजन सारख्या शहरांत आढळणाऱ्या पक्ष्यांना जाळीत पकडून त्यांचे किमान ५० किलोमीटर दूर स्थलांतर, या कबुतराची मुळ जागी परतण्याची प्रवृत्ती जास्त असते, त्यामुळे ही उपाययोजना.

वर्ष पक्ष्यांचे धडका प्राण्यांच्या धडका

२०२१ १,४६६ २९

२०२० १,१५२ १५

२०१९ १,२२७ १३

२०१८ १,२१४ १९

Web Title: India Airport Take Off Birds Problem

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Airportbirds
go to top