INDIA Alliance : निवडणूक निकालांचा धसका? इंडिया आघाडीच्या बैठकीला सापडेना मुहूर्त; 'या' बड्या नेत्यांनी फिरवली पाठ

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
INDIA Alliance congress Assembly Election results 2023 mamata banerjee nitish kumar akhilesh yadav
INDIA Alliance congress Assembly Election results 2023 mamata banerjee nitish kumar akhilesh yadav
Updated on

मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यात काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे. यानंतर विरोधी पक्षांची आघाडी INDIA मध्ये देखील गोंधळाची स्थिती पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी ६ डिसेंबर रोजी नियोजित बैठकीपासून दूर राहणं पसंत केलं.

यानंतर आता सध्याच्या ताज्या अपडेटनुसार, उद्या दिल्लीत होणारी ही विरोधकांची बैठक रद्द देखील करण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे. ही बैठक पुढे ढकलण्यात आली आहे.

काँग्रेसने बोलवली होती बैठक

विशेष बाब म्हणजे यावेळी इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी बोलवली आहे. असे असताना विरोधी पक्षांमधील काही नेते या बैठकीला उपस्थित राहणे टाळत असल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे निकाल नुकतेच जाहीर झाले आहेत, यासोबतच संसदेचे हिवाळी अधिवेशन देखील सुरू झालेले असताना ही बैठक बोलवण्यात आली. मात्र ममता बॅनर्जी यांनी दावा केला होता की त्यांना या बैठकीबद्दल माहितीच नाही. त्यामुळे विरोधकांच्या एकतेवर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.

निवडणूकांच्या निकालानंतर उत्तर प्रदेशातील वाराणसीत अखिलेश यादव यांनी काँग्रेसचं नाव न घेता टीका केली होती. ते म्हणाले की, आता निकाल समोर आले आहे, त्यानंतर अहंकार संपला आहे. येत्या काळात पुन्हा मार्ग निघेल. मात्र अखिलेश यादव हे देखील बैठकीला उपस्थित राहाणार की नाही याबद्दलल देखील संशय आहे. ममता बॅनर्जी यांनी देखील त्या कामात व्यग्र असल्याने या बैठकीला उपस्थित राहू शकणार नाहीत असे स्पष्ट केले आहे.

इतकेच नाही तर बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार हे देखील दिल्लीतील बैठकीला उपस्थित राहाणार नाहीयेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार,त्यांच्या ऐवजी दनता दल युनायटेड प्रमुख ललन सिंह आणि मंत्री संजय कुमार झा या बैठकीला हजेरी लावू शकतात. याखेरीज बैठकीत राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यादव आणि तेजस्वी यादव हे देखील बैठकीला हजेरी लावतील.

लोकसभा निवडणूकीपूर्वी भाजप विरोधात एकत्र आलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीची पहिली बैठक सप्टेंबर महिन्यात झाली होती. यानंतर तब्बल तीन महिन्यांनी पुन्हा विरोधक एकत्र आले. मात्र आतापर्यंत त्यांच्यामध्ये जागा वाटपावरून एकमत झालेलं नाहीये. तसेच पाच राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणूकांच्या निकालाची वाट पाहत असलेल्या काँग्रेसमुळे या मुद्द्यावर चर्चा अडकून पडली होती.

२०१८ साली मध्य प्रदेशात विजय मिळवणाऱ्या काँग्रस पक्षाने २०२० पूर्वीच सरकार गमावलं. आता २०२३ विधानसभा निवडणूकीत पक्षाला मोठा पराभव स्विकारावा लागला. मध्य प्रदेशात काँग्रेसला २३० जागांपैकी फक्त ६६ जागा जिंकता आल्या आहेत. तर भाजपने १६३ जागा जिंकल्या. तर राजस्थान आणि छत्तीसगड येथे देखील सत्तारुढ असलेल्या काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. दोन्ही राज्यात भाजप सत्ता स्थापन करत आहे. काँग्रेसला पाच पैकी फक्त तेलंगणा येथे विजय मिळाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.