INDIA vs Modi : 'इंडिया'वर हल्लाबोल करणाऱ्या NDAला स्वत:चं घर वाचवता येईना; 'आप'चा मोदींना टोला | Latest Marathi News | Breaking Marathi News | Marathi Tajya Batmya | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

INDIA vs Modi

INDIA vs Modi : 'इंडिया'वर हल्लाबोल करणाऱ्या NDAला स्वत:चं घर वाचवता येईना; 'आप'चा मोदींना टोला

नवी दिल्ली : तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम (एआयएडीएमके) वेगळे झाले आहेत. एआयएडीएमकेचे नेते डी जयकुमार यांनी सोमवारी सांगितले की, भाजपसोबत सध्या तरी युती नाही. आता आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी या प्रकरणाचा समाचार घेतला आहे.

आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करून म्हटलं की, " 'इंडिया' आघाडी तोडण्याचा प्रयत्न करणारे स्वत:च वेगळे होत आहेत. आजही तेच घडलं आहे. आमची इंडिया आघाडी कालही मजबूत होती आणि आजही मजबूत आहे, पण इतरांच्या घरावर दगडफेक करणारी NDA युती स्वतःचे घर वाचवू शकत नाहीये.

2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय युतीबाबत स्पष्टीकरण देताना AIADMKचे ज्येष्ठ नेते डी जयकुमार यांनी सोमवारी पत्रकारांना सांगितले की, "आम्ही निवडणुकीदरम्यानच भाजपसोबतच्या युतीबाबत निर्णय घेऊ. हे माझे वैयक्तिक मत नाही. ही आमच्या पक्षाची भूमिका आहे."