
नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास दहा दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडी या दोघांकडूनही उमेदवारांच्या नावांची चाचपणी सुरू आहे. ‘इंडिया’ आघाडीकडून संयुक्तपणे एकच उमेदवार दिला जाणार असून याबाबत काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे हे इतर विरोधी पक्षनेत्यांसोबत चर्चा करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.