India Allience Oppose One Nation One Election : केंद्रीय मंत्रिमंडळाने एक देश, एक निवडणूक या धोरणाच्या मसुद्याला मंजुरी दिली. हे विधेयक याच अधिवेशनात चर्चेला येण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा विरोध करत हा लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. ममता बॅनर्जी यांनी एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.