
नवी दिल्ली : भारत आणि फिजीदरम्यान संरक्षण सहकार्य मजबूत करण्यावर सहमती झाली आहे. भारत दौऱ्यावर आलेले फिजीचे पंतप्रधान सिटिवेनी राबुका यांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट झाली. त्यात संरक्षण कृती आराखड्यासह उभय देशामध्ये महत्त्वाच्या करारांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.