

Bypoll Results
sakal
नवी दिल्ली : बिहार विधानसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाबरोबरच देशभरातील सात राज्यांत विधानसभेसाठीच्या आठ जागांवर पोटनिवडणुका झाल्या होत्या या आठ जागांचे निकालही आज लागले आहेत. जम्मू-काश्मीरमधील बडगाम आणि नगरोटा, राजस्थानातील अंता, झारखंडमधील घटशिला, पंजाबमधील तरनतारन, मिझोराममधील डांपा, ओडिशामधील नुआपाडा आणि तेलंगणातील ज्युबिली हिल्स या विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकांत काश्मीर आणि तेलंगणात प्रस्थापित पक्षांचे उमेदवार पडल्याने या पक्षांसाठी हा धक्का मानला जात आहे.