Smart Fencing : भारत म्यानमार सीमेवर का बांधतोय स्मार्ट फेंस, जाणून घ्या सामान्य कुंपणापेक्षा यात वेगळं काय आहे?

भारत म्यानमारच्या सीमेवर स्मार्ट कुंपण बांधणार आहे
Smart Fencing
Smart Fencing esakal

Smart Fencing : भारत म्यानमारच्या सीमेवर स्मार्ट कुंपण बांधणार आहे. हे सीमेच्या 100 किमी परिक्षेत्रापर्यंत बांधले जाईल. गृह मंत्रालयाने सध्याची पाळत ठेवणारी यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी स्मार्ट कुंपण तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. मणिपूरमधील जातीय हिंसाचारामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. स्मार्ट कुंपण म्हणजे काय आणि ते सामान्य कुंपणापेक्षा किती आणि कसे वेगळे आहे ते जाणून घेऊया.

मणिपूरमधील वांशिक हिंसाचारासाठी म्यानमार आणि भारतात मध्ये नसलेलं कुंपण आणि अनियमित स्थलांतराला जबाबदार धरलं जातं आहे. मे महिन्यात झालेल्या हिंसाचारानंतर राज्यात 180 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या आठवड्यात प्रकाशित झालेल्या गृह मंत्रालयाच्या 2022-23 च्या वार्षिक अहवालात स्मार्ट फेंस योजना जाहीर करण्यात आली होती, ज्यामध्ये सरकारने म्हटलंय की सर्व ईशान्येकडील राज्यांमध्ये दहशतवादाशी संबंधित 201 घटनांची नोंद झाली आहे आणि मणिपूरमध्ये अशा 137 घटनांची नोंद झाली आहे.

Smart Fencing
Health Tips : तुम्हीही कामाच्या नादात ८ तासांपेक्षा जास्त वेळ एकाच जागी बसून राहता काय? जाणून घ्या तोटे

स्मार्ट फेंस काय आहे?

स्मार्ट फेंस हा सरकारच्या सर्वसमावेशक एकात्मिक सीमा व्यवस्थापन प्रणालीचा (CIBMS) एक भाग आहे. हे कॅमेरे, सेन्सर्स, लेसर आणि रडार प्रणालींद्वारे एक पाळत ठेवणारे उपकरण आणि चेतावणी प्रणाली दोन्ही म्हणून कार्य करते. अत्याधुनिक सेन्सर आणि सीसीटीव्ही कॅमेरे सीमेवरील अगदी हलकीशी हालचाल ओळखू शकतात आणि नियंत्रण केंद्राला अलर्ट पाठवू शकतात. तर सामान्य कुंपण हे फक्त तारांचे वर्तुळ असते.

Smart Fencing
Foods for Liver Health : हळद, कॉफीसह ‘या’ २ गोष्टींचा आहारात करा समावेश; यकृत राहील निरोगी

स्मार्ट फेंसची खासियत काय आहे?

स्मार्ट-टेक्नॉलॉजी-सहाय्यक कुंपणांमध्ये सेन्सर, नेटवर्क, बुद्धिमत्ता, डेटा स्टोरेज, कमांड आणि कंट्रोल सोल्यूशन्स यासह अनेक उपकरणे समाविष्ट आहेत. यामध्ये सीमांवर लेसर-आधारित अलार्म सिस्टम देखील समाविष्ट आहे. स्मार्ट फेन्सिंग मध्ये थर्मल इमेजेस, अंडरग्राउंड सेन्सर्स, फायबर ऑप्टिकल सेन्सर्स, रडार आणि सोनार यांसारखे सेन्सर्स टॉवर स्थापित केले जातात. स्मार्ट फेन्सिंगचा ग्राउंड सर्व्हिलन्स रडार सीमेच्या 180 अंश स्कॅन करू शकतो आणि 15 किमी अंतरावरील वाहने आणि 5 किमी अंतरावरील मानव शोधू शकतो.

Smart Fencing
World Mental Health Day 2023: कामाच्या तणावामुळे मानसिक आरोग्यावरही होतो वाईट परिणाम, अशा प्रकारे करा स्वतःचा बचाव

यातून सीमा सुरक्षेसाठी काय मदत होणार?

हा प्रकल्प पाकिस्तान, बांगलादेश आणि म्यानमारच्या सीमा पूर्णपणे सील करण्याच्या केंद्र सरकारच्या योजनेचा एक भाग आहे. सुरक्षा दल त्यांच्या नियंत्रण कक्षात बसवलेल्या मॉनिटर सिस्टमद्वारे सीमेवर लक्ष ठेवू शकतात. घुसखोरीचा कोणताही प्रयत्न होताच अलार्म वाजतो. भारताचा पहिला 'स्मार्ट फेंस' पायलट प्रोजेक्ट 2018 मध्ये तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी भारत-पाकिस्तान सीमेवर सुरू केला होता.

Smart Fencing
Health Care News: भारतीयांचं मानसिक आरोग्याकडे झालंय दुर्लक्ष; आजच फॉलो करा या टिप्स

भारत आणि म्यानमार दरम्यान FMR लागू आहे

भारत आणि म्यानमारमध्ये फ्री मूव्हमेंट रेजीम (FMR) लागू आहे. FMR अंतर्गत, डोंगरी जमातींचा प्रत्येक सदस्य, जो भारत किंवा म्यानमारचा नागरिक आहे आणि भारत-म्यानमार सीमेच्या दोन्ही बाजूला 16 किमीच्या आत असलेल्या कोणत्याही क्षेत्राचा रहिवासी आहे तो सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेला सीमा पास दाखवून सीमा ओलांडू शकतो आणि प्रत्येक भेटीत दोन आठवड्यांपर्यंत राहू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com