World Liver Day 2024 : हळद, कॉफीसह ‘या’ गोष्टींचा आहारात करा समावेश; यकृत राहील निरोगी

World Liver Day 2024 : यकृताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे.
World Liver Day 2024
World Liver Day 2024esakal

World Liver Day 2024 : आपल्या शरीराला डिटॉक्स करण्याचे काम यकृत करते. यकृत हा आपल्या शरीराचा अतिशय महत्वाचा आणि सर्वात मोठा अवयव आहे. यकृत आपल्या शरीरातील नैसर्गिक आणि पर्यावरणीय विषारी घटक आणि संसर्गजन्य घटक बाहेर काढण्यास मदत करते.

यकृताचे कार्य नीट चालले नाही तर आपल्या शरीराला अनेक गंभीर व्याधी होण्याची शक्यता असते. त्यामुळे, यकृताची काळजी घेणे हे महत्वाचे आहे. पित्त तयार करण्याचे महत्वाचे कार्य यकृत करते. यासोबतच कर्बोदके साठवून ठेवणे, प्रथिनांची निर्मिती करणे आणि पोषकद्रव्ये शोषून घेण्यापर्यंतची ही सर्व महत्वाची कार्ये यकृत करते.

यकृत खराब होण्यामागे अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये, अयोग्य आहार, बिघडलेली जीवनशैली इत्यादी कारणे असू शकतात. यकृताचे कार्य सुरळीत चालण्यासाठी आणि यकृताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग्य आहार घेणे महत्वाचे आहे. आज जागतिक यकृत दिनानिमित्त आपण यकृताचे आरोग्य चांगले राहण्यासाठी आहारात कोणत्या खाद्यपदार्थांचा समावेश करावा? याबद्दल जाणून घेणार आहोत.

World Liver Day 2024
World Liver Day 2024 : यकृत निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर आहेत 'ही' योगासने, जाणून घ्या करण्याची सोपी पद्धत

या खाद्यपदार्थांचा करा आहारात समावेश

ग्रीन टी

ग्रीन टी मध्ये मोठ्या प्रमाणात पोषकघटकांचा समावेश आढळतो. ग्रीन टीमध्ये आढळून येणारे कॅटेचिन हे संयुग आपल्या शरीरात अ‍ॅटीऑक्सिडंट्स म्हणून प्रभावीपणे काम करतात.

हे अ‍ॅंटीऑक्सिडंट्स यकृताची जळजळ कमी करण्याचे काम करतात आणि पाचक अवयवांवरील ऑक्सिडेटिव्ह तणावांचे परिणाम कमी करण्याचे काम करतात. (Green Tea)

World Liver Day 2024
World Mental Health Day : मुलांचे मानसिक आरोग्य मजबूत करण्याची गरज, तुमच्या कामी येतील 'या' टिप्स

हळद

हळदीमध्ये असलेले औषधी घटक आपल्या शरीरासाठी अतिशय प्रभावीपणे काम करतात. त्यामुळे, हळदीचा अनेक प्रकारे वापर आपण करतो. हळदीमध्ये असलेले दाहक-विरोधी गुणधर्म आणि त्यात असलेले अँटीऑक्सिडंट्स यकृत बरे करण्यासाठी महत्वाची भूमिका पार पाडतात. हळदीचे गुणधर्म पित्त उत्पादनास चालना देतात. (Turmeric)

बेरीज

बेरीजमध्ये अनेक प्रकार येतात. जसे की, स्ट्रॉबेरी, ब्लॅकबेरी आणि रास्पबेरी. या सर्व बेरीज आपले यकृताचे कार्य बिघडवण्यापासून वाचवतात. थोडक्यात यकृत खराब होण्यापासून या बेरीज आपला बचाव करतात.

बेरीज आपल्या शरीरातील चयापचयाची क्रिया सुधारतात. तसेच, फॅटी लिव्हरला टाळण्याचे काम करतात. शिवाय, पचनक्रियेतून विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी बेरीज मदत करतात. त्यामुळे, यकृताचे आरोग्य चांगले राखण्यासाठी बेरीजचा आहारात अवश्य समावेश करा. (Berries)

कॉफी

यकृताचे आरोग्य सुधारण्यास कॉफी मदत करू शकते. कॉफी हे सर्वोत्तम पेयांपैकी एक असलेले पेय आहे. काही संशोधनांमधून असे दिसून आले आहे की, कॉफी प्यायल्याने यकृताचे आजार टाळता येतात. (Coffee)

World Liver Day 2024
Health Benefits Of Chyavanprash : आरोग्यासाठी बहुगुणी आहे च्यवनप्राश, जाणून घ्या ‘हे’ फायदे

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com