India Census 2027: २०२७ च्या जनगणनेसाठी ११ हजार ७१८ कोटीची मंजुरी; दोन टप्प्यांत होणार प्रक्रिया
Union Cabinet Approves Budget for Census 2027: केंद्र सरकारने २०२७ च्या जनगणनेसाठी ११,७१८ कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देत जातींची गणनाही करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच खोबऱ्याच्या एमएसपीमध्ये वाढ व ‘कोलसेतू’ योजनेलाही मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली.
नवी दिल्ली : केंद्र सरकारने २०२७ मध्ये होत असलेल्या जनगणना प्रक्रियेसाठी ११ हजार ७१८ कोटी रुपये खर्चाच्या योजनेला मंजुरी दिली आहे. दोन टप्प्यांत होणाऱ्या या जनगणनेमध्ये जातींचीही गणना होईल.