भारत, चीन विकसनशील अर्थव्यवस्था नाहीत - ट्रम्प

पीटीआय
Thursday, 15 August 2019

भारत आणि चीन हे आता विकसनशील देश राहिले नसून, जागतिक व्यापार संघटनेकडून (डब्लूटीओ) त्यांना यापुढे सवलती घेऊ देणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिला.

वॉशिंग्टन - भारत आणि चीन हे आता विकसनशील देश राहिले नसून, जागतिक व्यापार संघटनेकडून (डब्लूटीओ) त्यांना यापुढे सवलती घेऊ देणार नाही, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी दिला.

ट्रम्प यांनी "अमेरिका फर्स्ट' धोरणावर भर दिला आहे. ते म्हणाले, 'भारत आणि चीन या आशियातील दोन मोठ्या अर्थव्यवस्था आहेत. त्या आता विकसनशील अर्थव्यवस्था राहिलेल्या नाहीत. यामुळे त्या "डब्लूटीओ'कडून फायदे मिळवू शकत नाहीत. असे असताना सध्या हे देश "डब्लूटीओ'कडून विकसनशील देशांच्या नावाखाली फायदे मिळवत आहेत. याचा फटका अमेरिकेला बसत आहे. अनेक वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. अमेरिकेच्या उत्पादनांवर भारत मोठ्या प्रमाणात शुल्क आकारत आहे.''

अमेरिकेच्या बाबतीत "डब्लूटीओ' योग्य भूमिका घेईल, असा आशावादही ट्रम्प यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, "डब्लूटीओ'च्या म्हणण्यानुसार भारत आणि चीन या देशांची वाढ सुरू आहे. आता त्यांची वाढ पूर्ण झालेली आहे. "डब्लूटीओ'च्या सवलतींचा फायदा या देशांना अमेरिका घेऊ देणार नाही. आम्ही सोडून सर्वांची वाढ सुरू असून, हे आम्ही स्वीकारणार नाही.

विकसनशील देशांना फायदे
- व्यापार सुरक्षेची हमी
- उत्पादनांवर कमी शुल्क
- व्यापारविषयक वादात झुकते माप
- ठराविक निर्यातीवर अनुदान


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India China are not developing economies Donald Trump