esakal | तणाव निवळण्याची चिन्हे; चिनी सैन्य एप्रिलपूर्वीच्या ठिकाणी जाण्यास तयार
sakal

बोलून बातमी शोधा

तणाव निवळण्याची चिन्हे; चिनी सैन्य एप्रिलपूर्वीच्या ठिकाणी जाण्यास तयार

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सहा नोव्हेंबरला चुशूल सेक्टरमध्ये भारत चीनदरम्यान कोअर कमांडर पातळीवरील चर्चेचा आठवा टप्पा पार पडला होता. यामध्ये दोन्ही बाजूंनी तयारी दर्शविल्यानंतर माघारीच्या योजनेवर चर्चा झाली.

तणाव निवळण्याची चिन्हे; चिनी सैन्य एप्रिलपूर्वीच्या ठिकाणी जाण्यास तयार

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - गलवान संघर्षानंतर निर्माण झालेला भारत-चीन सीमेवरील तणाव संपण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. दोन्ही देशांनी पूर्व लडाख भागातून सैन्य माघारीसाठी सहमती दर्शविल्याचे कळते. चिनी सैन्य एप्रिलपूर्वी जेथे होते तेथे जाण्यास तयार झाले आहे. सरकारकडून याबाबत कोणताही औपचारिक खुलासा झालेला नाही. मात्र, सहा नोव्हेंबरला झालेल्या लष्करीपातळीवरील चर्चेदरम्यान हा उभयमान्य तोडगा निघाल्याचे माहीतगार गोटातून आज सांगण्यात आले. 

सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर सहा नोव्हेंबरला चुशूल सेक्टरमध्ये भारत चीनदरम्यान कोअर कमांडर पातळीवरील चर्चेचा आठवा टप्पा पार पडला होता. यामध्ये दोन्ही बाजूंनी तयारी दर्शविल्यानंतर माघारीच्या योजनेवर चर्चा झाली. दिवाळीच्या कालावधीत चिनी सैन्य माघारीसाठी राजी झाले आहे. या चर्चेमध्ये डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स ब्रिगेडियर घई यांच्यासोबत परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव नवीन श्रीवास्तव हे देखील सहभागी झाले होते. उच्चपदस्थ सूत्रांच्या माहितीनुसार या योजनेनुसार प्यॉंगयॉंग त्सो भागातून आठवडाभराच्या आत माघारीस सुरवात होईल. तीन टप्प्यात चिनी सैन्याची माघारी सुरू होईल. यामध्ये पहिल्या रणगाडे, चिलखती वाहने सीमेवरून मागे जातील. चर्चेत ठरल्याप्रमाणे या लष्करी वाहनांची माघार एकाच दिवसात पूर्ण होणे अपेक्षित आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दुसऱ्या टप्प्यात दोन्ही देश आपल्या सैनिकांना तीन दिवसात माघारी नेतील. यामध्ये दररोज ३० टक्के सैनिकांना सीमेवरून मागे बोलावले जाईल. भारतीय सैन्य धनसिंग थापा चौकीपर्यंत मागे येईल. तर चिनी सैनिक फिंगर ८ च्या पूर्वेकडे माघारी जातील. तिसऱ्या टप्प्यामध्ये दोन्ही बाजूंची सेनादले प्यॉंगयॉंग त्सो तलावाच्या दक्षिण किनाऱ्यावरून आणि सीमेवरून माघारी परततील. यामध्ये चुशूल नजीकची सरहद्द आणि रेजांग ला या भागाचाही समावेश आहे. जूनमध्ये गलवान खोऱ्यात झालेल्या हिंसक झटापटीनंतर चिनी सैन्याबद्दलचा वाढलेला अविश्वास पाहता कोणतीही जोखीम पत्करण्याच्या मनःस्थितीत भारत नाही. त्यामुळे या माघारी प्रक्रियेवर बारकाईने लक्ष राहील, असे भारताने स्पष्ट केल्याचे समजते. त्यासाठी मानवरहित टेहेळणी विमानांचा वापर दोन्ही बाजूंकडून होईल. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अशी आहे प्रस्तावित सहमती
    प्यॉंगयॉंग त्सो तलावाच्या भागातून चीनची माघारीची तयारी
    चिनी सैन्य फिंगर आठपर्यंत मागे हटणार
    भारतीय सैन्य धनसिंग थापा लष्करी चौकीपर्यंत मागे हटणार

माघारीचे तीन टप्पे
    दोन्ही देश तीन दिवसात दररोज ३० टक्के सैनिकांना माघारी बोलावणार
    एप्रिलपूर्वी तैनात ठिकाणांपर्यंत दोन्ही बाजूंचे सैनिक माघारी जातील
    प्रथम रणगाडे, चिलखती वाहनांची माघारी पूर्ण केली जाईल
    अंतिम टप्प्यात चुशूल, रेजांग ला भागातील उंच सुळक्यांवरील ताबाही दोन्ही बाजू सोडती

loading image
go to top