चीन-पाकवर 'प्रलय'चं सावट; भारताकडून क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

Pralay' conventional ballistic missile: प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहे.
India conducted trial of Pralay' conventional ballistic missile
India conducted trial of Pralay' conventional ballistic missileEsakal

प्रलय बॅलेस्टिक मिसाईल (India conducted trial of Pralay' conventional ballistic missile)-

फक्त चोवीस तासांच्या आतच भारताने (India) गुरुवारी सलग दुसऱ्या अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र 'प्रलय'ची यशस्वी चाचणी करून इतिहास रचला. भारताच्या इतिहासात प्रथमच 24 तासांच्या आत दोन बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. जमिनीवरून जमिनीवर मारा करणारं 'प्रलय क्षेपणास्त्र' 'Pralay Missile' 150 ते 500 किमी (Missile Range- 150-500) अंतरावरील कोणतंही लक्ष्य उध्वस्त करण्यास सक्षम आहे. प्रलय मिसाईलमुळे भारताची लष्करी (Indian Military Forces) ताकद प्रचंड वाढली आहे.

India conducted trial of Pralay' conventional ballistic missile
चीनला कडक प्रत्युत्तर! LACवर भारताकडून S-400 क्षेपणास्त्र लवकरच तैनात

प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी (Successful test of Pralay Ballistic Missile)-

ओडिशाच्या किनारपट्टीवरील डॉ एपीजे अब्दुल कलाम बेटावरून (APJ Abdul Kalam island - Odisha) आज सकाळी अर्ध-बॅलिस्टिक क्षेपणास्त्र प्रलयची चाचणी घेण्यात आली. संरक्षण संशोधन विकास संस्थेने (Defense Research Development Organization -DRDO) विकसित केलेले घन-इंधन (Solid-fuel), लढाऊ क्षेपणास्त्र (battlefield Missile) भारतीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रम (Indian ballistic missile program) 'पृथ्वी डिफेन्स व्हेइकल' (Prithvi Defense Vehicle) अंतर्गत विकसित करण्यात आले आहे. पृष्ठभागावरून पृष्ठभागावर मारा करणाऱ्या प्रलय क्षेपणास्त्राची पेलोड क्षमता 500-1,000 किलोग्रॅम आहे.

प्रलय (Pralay) सॉलिड प्रोपेलेंट रॉकेट मोटर (Solid Propellant Rocket Motor) आणि इतर नवीन तंत्रज्ञानाने (New technologies) सुसज्ज आहे. क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणालीत (Missile Guidance System) अत्याधुनिक नेव्हिगेशनल (State-of-the-art navigation) आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे (integrated avionics) बसवण्यात आली आहेत.

India conducted trial of Pralay' conventional ballistic missile
समुद्रात भारताची ताकद वाढणार, नौदल 38 ब्राह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या तयारीत

चीनी क्षेपणास्त्रांना देणार टक्कर देण्यास सक्षम (Capable to beat Chinese Missiles)-

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे क्षेपणास्त्रावर डीआरडीओने (DRDO) 2015 साली प्रस्तावित केली होती. डीआरडीओने आपल्या वार्षिक अहवालात सांगितले होते की, प्रलय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चीनच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा मुकाबला करण्यास पूर्णपणे सक्षम आहे. या क्षेपणास्त्राचे वैशिष्ट्य म्हणजे ते जमिनीवरून तसेच कन्सटरवरूनही डागता येते. प्रलय क्षेपणास्त्र जमीन आणि समुद्रावरील कोणतंही लक्ष्य नष्ट करण्यासाठी सक्षम आहे. भविष्यात शत्रूच्या कोणत्याही क्षेपणास्त्राला भारत सक्षमपणे उत्तर देऊ शकतो.

India conducted trial of Pralay' conventional ballistic missile
लष्करासाठी आणखी एक क्षेपणास्त्र; एका वेळी शंभर टार्गेट ट्रॅक करण्याची क्षमता 

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Home minister Rajnath Singh) आणि डीआरडीओ अध्यक्षांनी (DRDO Chairman) केले अभिनंदन -

या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी ट्विट केले की, पहिल्या चाचणीसाठी DRDO आणि त्यांच्याशी संबंधित टीमचे अभिनंदन. ते म्हणाले, “आधुनिक जमिनीवर जमिनीवर मारा करणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी मी तुमचे अभिनंदन करतो, ही आजची महत्त्वपूर्ण कामगिरी आहे,” असे ते म्हणाले, तर डीआरडीओचे अध्यक्ष जी. सतीश रेड्डी म्हणाले की, नवीन पिढीचे क्षेपणास्त्र सशस्त्र दलांना अधिक बळ देईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com