
ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी 1800 कोटी रुपयांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
नवी दिल्ली- युद्धनौकांची मारक क्षमता वाढवण्यासाठी भारतीय नौदलाने 38 विस्तारित पल्ल्याचे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या क्षेपणास्त्राची सुमारे 450 किमी अंतरावरचे लक्ष्य भेदण्याची क्षमता आहे. हे क्षेपणास्त्र नौदलाच्या नव्याने तयार करण्यात येत असलेल्या युद्धनौकांवर तैनात केले जाणार आहे. या युद्धनौका लवकरच नौदलाच्या सेवेत रुजू होणार आहेत.
'एएनआय'ने दिलेल्या वृत्तानुसार, सरकारी सूत्रांनी सांगितले की 38 मारक क्षमता वाढलेल्या ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र खरेदी करण्यासाठी 1800 कोटी रुपयांचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवण्यात आला असून लवकरच त्याला मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे.
हेही वाचा- Vijay Diwas: भारताने पाकिस्तानला झुकवून जगाचा नकाशा बदलला होता
ब्राह्मोस युद्धनौकांचे प्रमुख शस्त्र असेल, जे नौदलासाठी अनेक युद्धनौकांवर पूर्वीपासून तैनात आहेत. भारतीय नौदलाने खोल समुद्रात 400 किमीपेक्षा अधिक अंतरावरील लक्ष्य भेदण्याची क्षमता दाखवण्यासाठी आयएनएस चेन्नई येथून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणीही केली होती.
हेही वाचा- कोरोनामुळे संसदेचे हिवाळी अधिवेशन रद्द;काँग्रेस म्हणते सरकारचा निर्णय चर्चेविना
भारत सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या निर्यातीसाठी खरेदीदार देश शोधत आहे. हे क्षेपणास्त्र डीआरडीओने आपल्या पीजे 10 योजनेअंतर्गत मोठ्याप्रमाणापर्यंत स्वदेशी बनावटीचे बनवले आहे. 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धात भारत आणि रशियाच्या संयुक्त उपक्रमा अंतर्गत ब्राह्मोस सुपरसॉनिक क्षेपणास्त्र भारताच्या तिन्ही सशस्त्र दलांसाठी एक शक्तिशाली हत्यार बनले आहे.
ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा