भारतातील मृत्यूदर सर्वांत कमी; केंद्र सरकारचा दावा

भारतातील मृत्यूदर सर्वांत कमी; केंद्र सरकारचा दावा

नवी दिल्ली -  कोरोनाच्या रूग्णांची संख्या देशात वाढत असताना केंद्र सरकारच्या नव्या दाव्यानुसार जगाच्या तुलनेत भारतातील कोरोना मृत्यूदर सर्वांत कमी म्हणजे २.८२ टक्के असल्याचे सांगितले. भारतातील कोरोना चाचण्यांची दैनंदीन क्षमता १ लाख २० हजारांवर गेल्याचे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे. 

रुग्णसंख्येत भारत जगात सातव्या क्रमांकावर आहे, या वस्तुस्थितीवर आधारित वृत्तावरही केंद्राने कुरबुरीचा सूर लावला आहे. ‘जगात सातव्या क्रमांकावर भारत’, असे म्हणताना भारत व इतर देशांची लोकसंख्या घनता, कोरोनाचा फैलाव होण्याचा काळ, मृत्यूदर या बाबीही (प्रसार माध्यमांनी) विचारात घ्याव्यात, केवळ आकड्यांवर जाऊ नये, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. 

सामूहिक संक्रमण नाही 
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की देशात ९५ हजार ५२७ जण आत्तापर्यंत बरे झाले आहेत. रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ४८ टक्के आहे. हे आत्तापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण आहे. ज्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांना इतरही कोणता ना कोणता आजार होता व त्यांचा वयोगटही ५५ ते ६० च्या पुढचा आहे. मृत्यूमुखी पडलेल्यांपैकी ५० टक्के रुग्ण देशाच्या १० टक्के भागातील आहेत. देशात सामूहिक संक्रमण (कम्युनिटी स्प्रेड) सुरू झाल्याचे काही वरिष्ठ तज्ज्ञांनी एका ताज्या अहवालात म्हटले होते. मात्र अग्रवाल यांनी ही शक्यता फेटाळताना ‘सामूहिक संक्रमण’ हा शब्द वापरण्यापूर्वी कोरोना संक्रमणाच्या फैलावाची मर्यादा अगोदर जाणून घ्यावी असा सल्ला दिला. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाबरोबरच जगा 
‘अनलॉक-१’ काळातही देश पुढे गेला पाहिजे व देशवासीयांनी कोरोनाबरोबरच जगण्याची सवय लावून घ्यावी, असेही अग्रवाल म्हणाले. वयोवृद्ध नागरीक, लहान मुले व गर्भवती महिलांनी अत्यावश्यक असेल त्यावेळीच घराबाहेर पडावे आणि इतरांनीही बाहेर वावरताना आरोग्य काळजी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

‘केंद्र व राज्यात मतभेद नाहीत’ 
केंद्र व राज्य सरकारांमध्ये कोरोनाविरुद्धाच्या लढाई काळात कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा अग्रवाल यांनी केला. ही अदृश्य विषाणूविरुद्धची लढाई सारे जण एकजुटीने लढत असल्यानेच भारताचे सकारात्मक चित्र दिसत आहे, असेही त्यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com