esakal | सलग चौथ्या दिवशी दिलासा; देशात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट
sakal

बोलून बातमी शोधा

corona

सलग चौथ्या दिवशी देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही ३० हजारांपेक्षा कमी आहे.

सलग चौथ्या दिवशी दिलासा; देशात सक्रीय रुग्णांच्या संख्येत घट

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत कमी अधिक प्रमाणात चढ उतार होताना दिसत आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे सलग चौथ्या दिवशी देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या ही ३० हजारांपेक्षा कमी आहे. मंगळवारी दिवसभरात २७ हजार १७६ नवे रुग्ण सापडले. तसंच सक्रीय रुग्णांच्या संख्येतही घट झाल्याचं दिसून आलं आहे. सध्या देशात ३ लाख ५१ हजार ८७ जणांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

भारतात रिकव्हरी रेट वाढला असून तो ९७.६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. याशिवाय आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णांच्या तुलनेत फक्त १.०५ टक्के सक्रीय रुग्ण देशात आहेत. गेल्या आठवड्यापासून वेगाने नव्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. केरळमधील रुग्णसंख्याही कमी झाली असून यामुळेच देशातील नव्या रुग्णसंख्येचा आकडा कमी झाल्याचं दिसत आहे.

हेही वाचा: केंद्रीय कर्मचाऱ्यांना लॉटरी; DA,DR मुळे वाढला HRA

मंगळवारी दिवसभरात २७ हजारांहून जास्त रुग्ण आढळले तर ३८ हजार जणांनी कोरोनावर मात केली. गेल्या २४ तासात सक्रीय रुग्णांच्या संख्येत यामुळे ११ हजाराने घट झाली. गेल्या एक आठवड्यात रुग्णसंख्या कमी झाल्यानं आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेटसुद्धा २ टक्के इतका झाला आहे. याशिवाय दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा १.६९ टक्के इतका आहे. गेल्या १६ दिवसांपासून हे प्रमाण ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे. तर आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा तीन महिन्यांपासून ३ टक्क्यांपेक्षा कमी आहे.

loading image
go to top