Corona Update : दिलासादायक! दीड वर्षानंतर देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या निच्चांकी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत जवळपास निम्मे रुग्ण हे केरळमधील असल्याचं चित्र गेल्या काही आठवड्यात दिसून येत आहे.

दीड वर्षानंतर देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या निच्चांकी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जगातील काही देशात पुन्हा कोरोनाने डोके वर काढले असताना भारतात मात्र दिलासादायक असं वातावरण आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. जवळपास दीड वर्षानंतर कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या ८ हजारांच्या खाली आली आहे. देशात सोमवारी दिवसभरात ७ हजार ५७९ नवे रुग्ण आढळले. तर १२ हजार २०२ जण कोरोनामुक्त झाले. गेल्या २४ तासात २३६ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देशाच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

देशातील सक्रीय रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. सध्या देशात १ लाख १३ हजार ५८४ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहे. गेल्या ५३६ दिवसातील ही सर्वात कमी संख्या आहे. तसंच एकूण कोरोना रुग्णांच्या तुलनेत एक टक्क्यांहून कमी प्रमाण आहे. मार्च २०२० पासून आतापर्यंत हे सर्वात कमी प्रमाण असून सध्या एकूण रुग्णांच्या ०.३३ टक्के इतके सक्रीय रुग्ण आहेत.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असतानाच केरळमध्येही दिलासा मिळत आहे. मात्र तरीही देशातील इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. देशातील नव्या रुग्णांच्या संख्येत जवळपास निम्मे रुग्ण हे केरळमधील असल्याचं चित्र गेल्या काही आठवड्यात दिसून येत आहे. सोमवारीसुद्धा नव्या ७ हजार ५७९ रुग्णांमध्ये ३ हजार ६९८ जण हे केरळमधील होते. तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ७५१५ इतकी होती. तर काल दिवसभरात केरळमध्ये कोरोनामुळे ७५ जणांचा मृत्यू झाला.

loading image
go to top