esakal | देशात दिवसभरात 91 हजार 702 रुग्ण; 3 हजार 403 मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

corona

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मे महिन्यातमध्ये देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला होता.

देशात दिवसभरात 91 हजार 702 रुग्ण; 3 हजार 403 मृत्यू

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. मे महिन्यातमध्ये देशात कोरोनाचा हाहाकार पाहायला मिळाला होता. दिवसभरात विक्रमी 4 लाख कोरोना रुग्णांचा आकडा गाठल्याचं देशानं पाहिलं आहे. पण, जून महिन्याच्या सुरुवातीपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळतीये. रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून 1 लाखांच्या आत नोंदली जात आहे. गेल्या 24 तासांत देशात 91 हजार 702 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (india corona update health ministry active cases covid19 vaccination)

दिवसभारत 91 हजार 702 रुग्णांची नोंद झाल्याने एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2 कोटी 92लाख 74 हजार 823 झाली आहे. गेल्या 24 तासांत 1 लाख 34 हजार 580 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांचा डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात सध्या कोरोनाचे 11 लाख 21 हजार 671 सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत 2 कोटी 77 लाख 90 हजार 073 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 403 रुग्णांना कोरोनाने बळी घेतलाय. त्यामुळे एकूण मृतांचा आकडा 3 लाख 63 हजार 079 झाला आहे.

हेही वाचा: ''कोरोनामुक्तांना लस घेण्याची आवश्यकता नाही''

कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी लसीकरण हा महत्त्वाचा पर्याय आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात 60 वर्षांपुढील व्यक्तींना लस दिली गेली. आता तिसऱ्या टप्प्यात 18 ते 44 वयोगटातील लोकांना लस दिली जात आहे. आतापर्यंत देशात 24 कोटी 60 लाख 85 हजार 649 नागरिकांना कोरोनाचा पहिला किंवा दुसरा डोस देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्येत घट होत असल्याचं पाहायला मिळाल होतं. पण रुग्णसंख्या पुन्हा वाढल्याचे दिसून आले. गुरुवारी राज्यात १२ हजार २०७ नवे रुग्ण आढळले आले. गेल्या २४ तासात ३९३ जणांचा मृत्यू झालाय. गेल्या अनेक दिवसांपासून रुग्णसंख्या १० हजाराच्या आत होती. पण गुरुवारी रुग्णसंख्येने १० हजाराचा टप्पा पुन्हा ओलांडला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ५८ लाख ७६ हजार ८७ वर पोहोचली आहे. राज्यात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. पण, रुग्णसंख्या वाढत असल्याने खबरदारी घेणे आवश्यक आहे.