esakal | देशात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; केरळमध्ये 30 हजार नवे रुग्ण
sakal

बोलून बातमी शोधा

Corona

देशातील एकूण रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक रुग्ण हे केरळमधील आहेत. काल दिवसभरात केरळमध्ये 30 हजार 203 नवे रुग्ण सापडले.

देशात रुग्णसंख्येत पुन्हा वाढ; केरळमध्ये 30 हजार नवे रुग्ण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - देशात गेल्या दोन आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत चढ उतार होताना दिसत आहे. सलग 5 दिवस 40 हजारांहून जास्त रुग्ण सापडल्यानंतर मंगळवारी देशात 31 हजार नव्या रुग्णांची नोंद झाली होती. मात्र पुन्हा एकदा देशात रुग्णसंख्या 40 हजारांच्या वर गेली आहे. मंगळवारी दिवसभरात देशात 41 हजार 965 नवीन रुग्ण सापडले आहेत. यामुळे सक्रीय रुग्णांच्या संख्येतही भर पडत असून सध्या भारतात 3 लाख 78 हजार 181 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

एकूण रुग्णांच्या तुलनेत सक्रीय रुग्णांचे प्रमाणही वाढून 1.15 टक्के इतक झालं आहे. दिवसभरात 41,965 नवे रुग्ण सापडले असून ३३,९६४ जण कोरोनामुक्त झाले. यामुळे सक्रीय रुग्णांची संख्या 8 हजारने वाढली. नव्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्यानं रिकव्हरी रेटसुद्धा कमी होत आहे. सध्या रिकव्हरी रेट हा 97.51 टक्के इतका आहे. तसंच आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट हा 2.58 टक्के इतका झाला आहे.

हेही वाचा: व्हायरल तापाचा हाहाकार; योगी आदित्यनाथ भेटलेल्या मुलीचा मृत्यू

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दिवसभरात 460 रुग्णांचा मृत्यू झाला. तर देशातील एकूण रुग्णांच्या संख्येत सर्वाधिक रुग्ण हे केरळमधील आहेत. काल दिवसभरात केरळमध्ये 30 हजार 203 नवे रुग्ण सापडले. तर 115 जणांचा मृत्यू झाला. केरळमध्ये गेल्या आठवड्याभरात दर दिवशी 20 ते 30 हजार रुग्ण सापडत आहेत.

loading image
go to top