esakal | Corona Updates: मृतांची संख्या पुन्हा वाढली
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Updates

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर द्यायला हवा, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहीमेकडे विशेष लक्ष दिले आहे.

Corona Updates: मृतांची संख्या पुन्हा वाढली

sakal_logo
By
एएनआय वृत्तसंस्था

नवी दिल्ली : गेल्या आठवड्यापर्यंत दिवसेंदिवस वाढणारी कोरोनाग्रस्तांची संख्या आता कमी होऊ लागली आहे. सक्रिय रुग्णांची संख्याही कमी होऊ लागली आहे. गेल्या २४ तासात २ लाख ८ हजार ९२१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दुसरीकडे २ लाख ९५ हजार ९५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र गेल्या २४ तासात ४ हजार १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. (India Corona Updates 4157 deaths in last 24 hrs as per Health Ministry)

सध्या देशभरात २४ लाख, ९५ हजार ५९१ रुग्ण कोरोनावरील उपचार घेत आहेत. तसेच २ कोटी ४३ लाख ५० हजार ८१६ जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. आतापर्यंत २ कोटी ७१ लाख ५७ हजार ७९५ जणांना कोरोनाची लागण झाली होती.

हेही वाचा: भारत सरकारच्या विरोधात WhatsApp न्यायालयात

कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरणावर भर द्यायला हवा, असं तज्ज्ञांचं मत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांनी लसीकरण मोहीमेकडे विशेष लक्ष दिले आहे. आतापर्यंत २० कोटी ६ लाख ६२ हजार ४५६ जणांचे लसीकरण करण्यात आलं आहे. लसींचा अपव्यय १ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याचे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. मात्र काही राज्ये याकडे दुर्लक्ष करत आहेत. झारखंड (३७.३ टक्के), छत्तीसगड (३०.२ टक्के), तमिळनाडू (१५.५ टक्के), जम्मू आणि काश्मीर (१०.८ टक्के), मध्य प्रदेश (१०.७ टक्के) ही राज्ये लसींचा अपव्यय करण्यात आघाडीवर आहेत. संपूर्ण देशभरात ६.३ टक्के लसींचा अपव्यय होत आहे.

हेही वाचा: कोण आहेत CBI चे नवे प्रमुख; महाराष्ट्राशी खास कनेक्शन

लसांचा अपव्यय 1% पेक्षा कमी ठेवण्यासाठी राज्यांना वारंवार आवाहन केले गेले आहे, झारखंड (.3 37..3%), छत्तीसगड (.2०.२%), तामिळनाडू (१.5.%%), जम्मू व काश्मीर (१०.8%), मध्य प्रदेश (१०.7%) अशी अनेक राज्ये आहेत. राष्ट्रीय सरासरी (6.3%) च्या तुलनेत बर्‍याच प्रमाणात अपव्यय नोंदविणे: आरोग्य मंत्रालय

मंगळवारी दिवसभरात २२ लाख १७ हजार ३२० जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. एका दिवसात सर्वात जास्त नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा हा विक्रम ठरला आहे. आतापर्यंत देशभरातील ३३ कोटी ४८ लाख ११ हजार ४९६ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

दरम्यान, ४० दिवसानंतर रुग्णसंख्या २ लाखांच्या खाली आली आहे. १४ एप्रिलनंतर कोरोना रुग्णसंख्येत सर्वात मोठी घट पाहायला मिळाली आहे. मंगळवारी सक्रिय रुग्णांची संख्या ९१ हजार १९१ ने घटली आहे. सध्या बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९.६६ टक्क्यांवर पोहोचले आहे. आठवड्याला ११.४५ टक्के, तर दिवसाला ९.४२ टक्के पॉझिटिव्हिटी दर आहे.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.