भारतात मे महिन्यात कोरोना रुग्णांसह मृतांची नोंद सर्वाधिक

भारतात मे महिन्यात एकूण ९०.३ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. आतापर्यंत भारतात एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळले नव्हते.
Corona Warriors
Corona Warriorsesakal
Summary

काही तज्ज्ञांचं मत आहे की वास्तवात मृतांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते.

नवी दिल्ली : भारतात ५४ दिवसांनंतर मंगळवारी (ता.१) सर्वात कमी कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या २४ तासात १ लाख २७ हजार ५१० रुग्ण आढळून आले. कोरोना संक्रमणाच्या बाबतीत मे महिना भारतासाठी वाईट ठरला. मे महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले. मे महिन्यात जगातील सर्व देशांमध्ये सर्वाधिक कोरोनाचे नवे रुग्ण आणि मृत्यू भारतात नोंदवले गेले. जेव्हापासून कोरोना महामारीला सुरवात झाली तेव्हापासून आतापर्यंतचे सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू हे मे महिन्यात नोंदविले गेले आहेत.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना संक्रमणामध्ये घट होण्यास सुरवात झाली. कोरोनाचे नवे रुग्ण झपाट्याने कमी होऊ लागले. नव्या रुग्णांनी ४ लाखांचा टप्पा पार केला होता. तसेच दिवसभरातील मृतांची संख्याही वाढली होती. मात्र गेल्या ५४ दिवसांनंतर मंगळवारी सर्वात कमी रुग्ण आढळून आले. मृतांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास असे दिसून येते की, गेल्या २४ तासात २ हजार ७९५ मृत्यू झाले. २२ एप्रिलनंतर मंगळवारी सर्वात कमी मृत्यू नोंदविले गेले.

भारतात मे महिन्यात एकूण ९०.३ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळून आले. आतापर्यंत भारतात एवढ्या मोठ्या संख्येत रुग्ण आढळले नव्हते. मे महिन्यात कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत ३० टक्क्यांनी वाढ झाली होती. एप्रिलमध्ये भारतात ६९.४ लाख इतके रुग्ण आढळले होते. ७ मे रोजी देशात सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती.

Corona Warriors
'मोदी सरकारची अकार्यक्षमताच जीडीपीच्या घसरणीला जबाबदार'

दुसरीकडे भारतात मे महिन्यातच सर्वाधिक मृत्यू देखील नोंदविले गेले आहेत. देशभरात मे महिन्यात नोंदविल्या गेलेल्या आकडेवारीनुसार, १ लाख १९ हजार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एप्रिल महिन्यात ४८ हजार ७६८ जणांचा मृत्यू झाला होता. मे महिन्यात मृतांची संख्या दुपटीने वाढली. काही तज्ज्ञांचं मत आहे की वास्तवात मृतांची संख्या यापेक्षा जास्त असू शकते.

गेल्या २४ तासांत देशात २.५५ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. लागोपाठ १९ व्या दिवशी कोरोना रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. तसेच सलग १९ दिवसांपासून उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत मोठी घट पाहायला मिळत आहे. देशात आतापर्यंत २ कोटी ३९ लाख ५९ हजार ६२९ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात सध्या १८ लाख ९५ हजार ५२० रुग्ण उपचाराधीन आहेत.

Corona Warriors
कोरोनासोबत म्युकरमायकोसिस संकट; 26 राज्यात संसर्ग

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com