अखेर लस मिळणार; सीरमच्या लशीला मंजुरी मिळण्याची शक्यता

वृत्तसंस्था
Wednesday, 30 December 2020

कोरोना लशीसंबंधात भारतीयांना आज चांगली बातमी समजू शकते

नवी दिल्ली- कोरोना लशीसंबंधात भारतीयांना आज चांगली बातमी समजू शकते. कोरोना लस कोविशिल्डला आज आपत्कालीन वापरासाठी मंजुरी मिळू शकते. बुधवारी कोरोना लशीसंबंधी एक्सपर्टं कमेटीची (SEC) बैठक सुरु आहे, ज्यात कोरोना लशीला मंजुरी मिळण्याचा निर्णय होऊ शकतो. 

सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लशीच्या प्रस्तावावर ड्रग्ज कंट्रोलर ऑफ इंडिया (डीसीआय) बैठकीमध्ये विचार करत आहे. ब्रिटेनच्या ऑक्सफर्ड यूनिव्हर्सिटीच्या लशीला मंजुरी मिळाली आहे. सीरम इन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाशी करार केला असून त्यांच्या मदतीनेच भारतात कोविशिल्ड लशीची निर्मिती केली जात आहे. त्यामुळे सीरमला या लशीसाठी आजच मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे. लशीला मंजुरी मिळाल्यास भारतीयांसाठी ही दिलासादायक बाब असणार आहे.  

सावधान! कोरोना व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी कॉल करून होतेय फसवणूक

भारतात सीरम इन्स्टिट्यूट तयार करत आहे लस 

ब्रिटेनमध्ये ऑक्सफर्ड-अस्ट्राझेनेकाची कोरोना लस नागरिकांना लवकरच दिली जाणार आहे. त्यामुळे भारतातही सीरम इन्स्टिट्यूट लस उपलब्ध करुन देऊ शकते. सीरम इन्स्टिट्यूटने त्यांच्याकडे 5 कोटी डोसचा स्टॉक असल्याचे जाहीर केले होते. तसेच 2021 च्या शेवटपर्यंत 30 कोटी डोस तयार करण्याची त्यांनी तयारी दाखवली आहे. सीरम जे काही उत्पादन घेईल, त्यातील अर्धा हिस्सा भारतीयांसाठी राखीब असणार आहे. 

भारतमध्ये लसीकरणाची तयारी

भारत सरकारकडून लसीकरणाची तयारी केली जात आहे. यासाठी देशातील 4 राज्यांमध्ये रंगीत तालीमही घेण्यात आली. सुरुवातीला 30 कोटी जनतेपर्यंत लस पुरवण्याचे लक्ष्य आहे. यात कोरोना वॉरियर्सना प्राथमिकता देण्यात येईल. आरोग्य कर्मचारी, कोरोना वॉरियर्स, 50 वर्ष वयापुढील लोक आणि आजारी लोकांना सर्वात आधी कोरोना लस देण्यात येईल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: india corona virus covishield serum institute got approval