सावधान! कोरोना व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी कॉल करून होतेय फसवणूक

Vaccine-Covid
Vaccine-Covid

नवी दिल्ली - गेल्या वर्षभरापासून जगभर थैमान घातलेल्या कोरोनावर आता लस लवकरच सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल. दरम्यान, ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. काही देशांमध्ये लसीकरणाला सुरुवातही झाली आहे. तर भारतात सीरम इन्स्टिट्यूटने आपत्कालीन परिस्थितीत व्हॅक्सिनच्या वापरासाठी परवानगी मागितली आहे. याशिवाय गेल्या दोन दिवसात देशातील चार राज्यांमध्ये लसीकरणाची रंगीत तालीमही घेण्यात आली. लोक आता कोरोना लशीकडे आशेनं बघत असताना यातही फसवणूक करणाऱ्यांनी संधी साधण्यास सुरुवात केली आहे.

सायबर हल्लेखोरांनी आता त्यांचा मोर्चा व्हॅक्सिनकडे वळवला आहे. व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनच्या नावाखाली फोन करून फसवणूक केली जात असल्याचे प्रकार देशभरात उघडकीस आले आहेत. जर तुम्हाला फोन आला आणि तो उचललात तर तुमचं खातं रिकामं होऊ शकतं. फसवणुकीसाठी वेगवेगळे फंडे आता सायबर हल्लेखोरांकडून वापरले जात आहेत. 

ठाणे पोलिसांच्या सायबर सेलने मंगळवारी पोलिसांना सावध करताना सांगितलं की, कोरोना व्हायरसवर व्हॅक्सिनच्या रजिस्ट्रेशनसाठी कॉल आला तर काळजी घ्या. कोणत्याही प्रकारची माहिती फोनवरून सांगू नका. फोन करणाऱ्यांकडून आधारकार्ड डिटेल्स, इमेल आयडी आणि इतर माहिती विचारली जाऊ शकते. आधारकार्डचे डिटेल्स दिल्यास तुम्हाला वन टाइम पासवर्डची विचारणा केली जाऊ शकते. कोणत्याही परिस्थितीत अशा प्रकारे ओटीपी देऊ नये असं म्हटलं आहे. 

ठाणे पोलिसांनी ट्विटरवर म्हटलं की, कोरोना वँक्सीन रजिस्ट्रेशनसाठी अनोळखी इसम फोन कॉल्स करून नाव, ईमेल, आधारकार्ड इ. माहिती मागतात. तसेच आधारकार्ड नोंदणीकृत करण्यासाठी OTP मागतात. OTP शेअर केल्यावर ऑनलाईन फसवणूक होत असल्याच्या घटना निदर्शनास येत आहे. नागरिकांनी अशा फोनकॉल्स/लिंक/मेसेजेस यांना प्रतिसाद देऊ नये.

फसवणूक करणारे वेगवेगळ्या नंबर्सचा वापर करत आहेत. जर एखाद्याला अशी माहिती विचारण्यासाठी फोन आला तर याबाबत पोलिसांना सांगा. यामुळे सर्व नंबर्सचा डेटा एकत्र करता येईळ. सर्वसामान्यांनी सध्याच्या या संकटकाळात सावध राहण्याची गरज आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com