पुणे, मुंबई आणि दिल्लीत कोरोनाचा स्फोट, 24 तासांत देशात 50 हजारांपेक्षा जास्त नवे रुग्ण

corona update india
corona update india

नवी दिल्ली - देशात कोरोना रुग्णांची संख्या वेगानं वाढत आहे. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण असून देशाची राजधानी दिल्लीतही कोरोनाच उद्रेक बघायला मिळत आहे. महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यांच आवाहन सरकारकडून सातत्यानं केलं जात आहे. महाराष्ट्रात रविवारी रात्रीपासून नाइट कर्फ्यू लागू केला आहे. मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊनचे संकेतही देण्यात आले आहेत. महाराष्ट्रात सोमवारी दिवसभरात 31 हजार 643 रुग्ण आढळले.

भारतात सोमवारी दिवसभरात 56 हजार 211 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 37 हजार 28 जण कोरोनामुक्त झाले. देशात गेल्या 24 तासात 271 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी दिली. आतापर्यंत भारतातील 1 कोटी 20 लाख 95 हजार 855 जणांना कोरोनाची लागण झाली असून 1 कोटी 13 लाख 93 हजार 21 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सक्रीय रुग्णांची संख्या 5 लाख 40 हजार 720 इतकी आहे. आतापर्यंत कोरोनामुळे देशातील 1 लाख 62 हजार 114 जणांचा मृत्यू झाला आहे. 

राज्यात तीन लाख 57 हजार आयसोलेशन बेड्स असून यापैकी एक लाख 7 हजार रुग्ण आहेत. 60 हजार 349 ऑक्सिजन बेडपैकी 12 हजार 701 बेड्स भरले आहेत. महाराष्ट्रात सोमवारी 31 हजार 643 नवीन रुग्ण आढळले. तर दिवसभरात 102 जणांचा मृत्यू झाला. राज्यात पुणे आणि मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात सोमवारी 4 हजार 961 तर मुंबईत 5 हजार 890 नवीन रुग्ण आढळले आहेत. 

देशात राजधानी दिल्लीतही कोरोना बाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. सोमवारी दिल्लीत 1900 हून अधिक कोरोना रुग्ण सापडले आहेत. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार दिल्लीत 1904 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. याआधी दिल्लीत 13 सप्टेंबरला 1984 जणांना कोरोनाची लागण झाली होती. 

देशातील इतर राज्यांमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी अधिक प्रमाणात दिसून येत आहे. गुजरातमध्ये 2 हजार 270 रुग्ण आढलले आहेत. तर उत्तर प्रदेशात दिवसभरात 1 हजार 446 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com