esakal | भारतात आरोग्य विभागाची मोठी कामगिरी; २५ टक्के लोकांचे पूर्ण लसीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccination

भारतात आरोग्य विभागाची मोठी कामगिरी, 25 टक्के पूर्ण लसीकरण

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भारतातील लसीकरण मोहिमेत मंगळवारी आणखी एक विक्रम झाला आहे. भारतातील चार व्यक्तींपैकी एकाला दोन्ही डोस मिळाले आहेत.

भारतातील लसीकरण मोहिमेत मंगळवारी आणखी एक विक्रम झाला आहे. भारतातील चार व्यक्तींपैकी एकाला दोन्ही डोस मिळाले आहेत. भारातातील २४.८ टक्के लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तर ४३.५ टक्के लोकांना किमान एक डोस देण्यात आला आहे.

देशात कोरोनाची सक्रीय रुग्णसंख्या ही गेल्या सहा महिन्यांपासून ३ लाखांच्या वर होती. हळू हळू आता कोरोनामुक्तांची संख्या वाढत असून रुग्णसंख्येत घट होत आहे. यामुळे सक्रीय रुग्णांचे प्रमाणही कमी होत आहे. मंगळवारच्या आकडेवारीनुसार, भारतात ६४ कोटी २५ लाख लोकांना लस देण्यात आली आहे. यात दोन डोस घेतलेल्यांचाही समावेश आहे. चीननंतर भारत दुसरा देश आहे जिथं सर्वाधिक लोकांचे लसीकरण झाले आहे.

हेही वाचा: काँग्रेस हायकमांडनं फेटाळला सिद्धूंचा राजीनामा

लसीकरण झालेल्यांमध्ये दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या २३ कोटी ३६ लाख इतकी आहे तर ४४ कोटी ८९ लाख लोकांना किमान एक डोस देण्यात आला आहे. देशातील १८ वर्षांवरील २४.८ टक्के लोकसंख्येला लस देण्यात आली आहे. बुधवारी ही आकडेवारी २५ टक्क्यांच्या वर पोहोचेल.

देशात लसीकरण मोहिम वेगाने सुरु असली तरी काही राज्यात मात्र यात अडथळे येत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड या राज्यांमध्ये १६ टक्क्यांहून कमी लसीकरण झाले आहे. भारताने आतापर्यंत सप्टेंबर महिन्यात २२.५ कोटी डोस दिले आहेत. ऑगस्टमध्ये हीच संख्या १८.३५ कोटी डोस इतकी होती. ऑगस्टमध्ये दर दिवशी ५९ लाख डोस देण्यात येत होते. सप्टेंबरमध्ये हे प्रमाण वाढून दर दिवशी ८० लाख इतकं झालं आहे.

loading image
go to top