India COVID Cases : देशभरात पुन्हा एकदा कोविड-१९ संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (Union Health Ministry) ताज्या आकडेवारीनुसार, शनिवारी सकाळपर्यंत देशातील सक्रिय कोरोना रुग्णांची (Corona Patient) संख्या ५,७५५ वर पोहोचली असून आतापर्यंत ५,४८४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.