भारतात 16 दिवसांत कोरोनाने केला कहर; रुग्ण वाढीचा वेग चिंताजनक

टीम ई-सकाळ
Saturday, 22 August 2020

भारतात 10 लाखांपासून 20 लाख रुग्ण संख्या होण्यासाठी 21 दिवस लागले होते. त्यानंतर पुढचे 10 लाख रुग्ण अवघ्या 16 दिवसांत वाढले आहेत. ही वेगाने होणारी वाढ देशातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी चिंताजनक ठरत आहे.

नवी दिल्ली : जगभरात कोरोनाचा Covid19 वेगाने प्रसार होत असताना, एकेकाळी भारतातील India Covid updates रुग्ण वाढीचा वेग अतिशय कमी होता. पण, अनलॉकनंतर सोशल डिस्टंसिंग Social Distancing न पाळल्याचे गंभीर दुष्परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. गेल्या 16 दिवसांत देशात जवळपास दहा लाख कोरोना रुग्णांची भर पडली आहे. रोज जवळपास 70 हजारच्या आसपास रुग्ण सापडत असल्यामुळं देशातील कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होत आहे. 

देशभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

रुग्ण वाढीचा वेग सर्वाधिक
जगात सध्या 30 लाखांच्या वर रुग्ण संख्या झालेल्या देशांमध्ये भारत तिसरा देश असण्याची शक्यता आहे. अमेरिका USA आणि ब्राझीलमध्ये Brazil सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. यातही भारतातील रुग्ण वाढीचा वेग धडकी भरवणार आहे. कारण, ब्राझीलमध्ये 20 ते 30 लाख रुग्ण होण्यासाठी 28 दिवस लागले होते. भारतात 10 लाख रुग्णसंख्या होण्यासाठी सर्वाधिक 138 दिवस लागले होते. परंतु, त्यानंतर भारतातील कोरोना वाढीचा वेग काही थांबण्यास तयार नाही. भारतात 10 लाखांपासून 20 लाख रुग्ण संख्या होण्यासाठी 21 दिवस लागले होते. त्यानंतर पुढचे 10 लाख रुग्ण अवघ्या 16 दिवसांत वाढले आहेत. ही वेगाने होणारी वाढ देशातील संपूर्ण आरोग्य यंत्रणेसाठी चिंताजनक ठरत आहे. ब्राझीलमध्ये 10 लाखांपासून 20 लाख रुग्ण संख्या होण्यासाठी 27 आणि अमेरिकेला 43 दिवस लागले होते. 

मृत्यूदर सर्वांत कमी
भारतात रुग्ण वाढत असले तरी, एक समाधानकारक बाब अशी आहे की, जगाच्या तुलनेत भारतात मृत्यू दर सर्वांत कमी आहे. ब्राझील आणि अमेरिकेत लाखांवर कोरोना बळी गेले आहेत. तुलनेत भारतात कोरोनामुळं मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाण अतिशय कमी आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत एक लाख तर, अमेरिकेत 1 लाख 30 हजार जणांचा कोरोनामुळं बळी गेलाय. भारतातील आतापर्यंतची रुग्ण संख्या 30 लाखांपर्यंत गेली असली तरी, 55 हजार 928 जणांचा कोरोनानं बळी  गेलाय. भारतातील मृत्यू दर 2 टक्क्यांपेक्षाही कमी आहे, हीच मोठी समाधानाची बाब आहे. 

जगभरातील इतर बातम्यांसाठी येथे क्लिक करा

ऍक्टिव रुग्णही वाढले 
भारतात सध्या कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण चांगले असले तरी, ऍक्टिव Covid active patients in India रुग्णांची संख्या आता 7 लाखांवर गेलीय. केवळ 15 दिवसांत भारताती ऍक्टिव रुग्ण 6 लाखांवरून 7 लाख झाले आहेत. विशेष म्हणजे, 5 लाखाांवरून 6 लाख  ऍक्टिव रुग्ण होण्यासाठी केवळ 9 दिवस लागले होते. यावरून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही भारतात सर्वांत चांगले असल्याचे स्पष्ट होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India Covid updates around 1 million cases within 16 days