Corona Cases In India : देशात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Cases) झपाट्याने वाढत आहे. गेल्या १० दिवसांत कोविड-१९ च्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या (Health Ministry) वेबसाइटवरील आकडेवारीनुसार, गेल्या १० दिवसांत रुग्णसंख्या २५७ वरून थेट ३७०० पार गेली आहे. हे आकडे चिंता वाढवणारे आहेत. जर हीच स्थिती राहिली, तर लवकरच प्रशासनाला पुन्हा कडक निर्बंध लागू करावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशात पुन्हा लाॅकडाउन लागणार का? अशीही चर्चा सुरु झाली आहे.