देशाचा विकास जलद गतीने होतोय - PM मोदी

आजपासून संसदेच पावसाळी अधिवशेन सुरु, अनेक मुद्दे चर्चेला येणार - नरेंद्र मोदी
Prime Minister Narendra Modi
Prime Minister Narendra Modi Sakal
Summary

आजपासून संसदेच पावसाळी अधिवशेन सुरु, अनेक मुद्दे चर्चेला येणार - नरेंद्र मोदी

देशाचा विकास जलद गतीने होत आहे. सभागृहाचा सकारात्मक वापर होऊन यातून देशाच्या उन्नतीसाठी उपयुक्त काम होईल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे. याशिवाय उत्तम काम होण्यासाठी सगळ्यांकडून सहकार्याची आशाही त्यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद भवनात दाखल झाले असून पावसाळी अधिवेशनापूर्वी त्यांनी संवाद साधला आहे.

हा कालखंड स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव असून आगामी २५ वर्षात जेव्हा शतक साजरं होईल तेव्हा तो प्रवास कसा असावा, किती वेगाने करावा, कोणती नवी उंची गाठावी याचा संकल्प करण्याचा आणि त्यासाठी संसद देशाला दिशा देईल. त्यामुळे देशाला नवी ऊर्जा देण्याचं कारण ठरण्यासाठी हे अधिवेशन महत्वाचं आहे असंही पंतप्रधान म्हणाले आहेत.

Prime Minister Narendra Modi
चिमुकलीचा CM शिंदेकडे हट्ट, "मलाही गुवाहाटीला न्या"; मुख्यमंत्री निरुत्तर

आजपासून संसदेच पावसाळी अधिवशेन सुरु होत आहे. यामुळे अधिवेशनात अनेक मुद्दे चर्चेला येणार आहेत. या अधिवेशनात २४ नवीन विधेयक मांडणार असून यावर चर्चा होणार आहे. दरम्यान, मोदींनी अधिवेशनात अनेक विषयांवर उत्तम चर्चा व्हावी अशी सर्व खासदारांना विनंती केली आहे. देशाला नवे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती मिळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील विकास कामे करण्यास बळ मिळेल असंही पंतप्रधान मोदी म्हणाले आहेत.

पुढे ते म्हणाले की, संसद हे संवादाचे एक सक्षम माध्यम आहे. येथे वादविवाद, माहिती, विश्लेषण यावर बोलणे आणि चर्चा होणे आवश्यक आहे. या विषयांवर चिंतन, चर्चा करण्याची विनंती पंतप्रधानांनी खासदारांना केली आहे. त्यामुळे या पावसाळी अधिवेशनाच्या सत्राचा अधिक वापर हा विकास कामांवर भर देण्यासाठी व्हावा आणि सदनचा अधिकाधिक उपयोग हा सकारात्मक चर्चेसाठी व्हावा असे आवाहनही त्यांनी केलं आहे.

Prime Minister Narendra Modi
कंगाल श्रीलंकेत पुन्हा आणीबाणी जाहीर; विक्रमसिंघेंचे आदेश

सभागृहाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपण सर्वांनी त्याचा राष्ट्रहितासाठी वापर करुयात. स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं त्यांच्या स्वप्नांना लक्षात ठेवत सभागृहाचा सर्वाधिक सकारात्मक उपयोग झाला पाहिजे, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com