Karnataka Unemployment Rate
esakal
बंगळूर : रोजगाराच्या बाबतीत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कर्नाटकाने उल्लेखनीय कामगिरी (Karnataka Unemployment Rate) केली असून, सर्वात कमी बेरोजगारी दर असलेल्या राज्यांच्या यादीत कर्नाटकाने दुसरे स्थान मिळवले आहे. केंद्र सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आवर्ती कामगार बळ सर्वेक्षण (जुलै ते सप्टेंबर २०२५) अहवालातून ही माहिती समोर आली आहे.