

India Germany FTA Update Piyush Goyal Says Free Trade Agreement Will Become Operational Within Six Months
sakal
बर्लिन : भारत आणि जर्मनीसह युरोपीय महासंघाने केवळ व्यापार आणि गुंतवणुकीपुरते मर्यादित न राहता उद्योग, संशोधन, तंत्रज्ञान, कौशल्य आणि शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने उत्कृष्ट भविष्याची उभारणी करावी, असे आवाहन केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी गुरुवारी येथे केले. भारत-युरोपीय महासंघ मुक्त व्यापार करारासाठी (फ्री ट्रेड अॅग्रीमेंट- एफटीए) तब्बल २० वर्षे लागली; आता मात्र पुढील पाच-सहा महिन्यांत हा करार प्रत्यक्षात व्यापारात उतरेल, अशी घोषणाही गोयल यांनी केली.