मेरीटाइम थिएटर कमांडची तयारी अंतिम टप्प्यात, जाणून घ्या ड्रॅगनची झोप उडवणारा भारताचा मास्टर प्लॅन

सकाळ ऑनलाइन टीम
Monday, 7 December 2020

सध्याच्या घडीला चीनमध्ये पाच थिएटर कमांड असून भारत चीनला टक्कर देण्यासाठी सज्ज होतोय.

देशातील  पहिली थिएटर कमांड पुढील वर्षी अस्तित्वात येणार आहे. भारतीय सागरी क्षेत्रातील सुरक्षिततेता अधिक मजबूत करण्याच्या इराद्याने या कमांडचे काम हाती घेण्यात आले आहे. देशात अशा प्रकारच्या एकापेक्षा जास्त थिएटर कमांड उभारण्यात येणार असून चीन सीमेलगत उत्तरी थिएटर कमांड, पाकिस्तान सीमेजवळ पश्चिमी थिएटर कमांड आणि दक्षिण भारताच्या पट्ट्यात पेनसुएला थिएटर कमांड उभारण्यात येणार आहे.  

समुद्र आणि बेटांच्या सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर मेरीटाइम थिएटर कमांड आणि हवाई सुरक्षिततेच्या दृष्टिने एअर डिफेन्स थिएटरची निर्मिती करण्यात येणार आहे. पाच कमांड तयार झाल्यानंतर स्पेस थिएटर कमांड आणि लॉजिस्टिक थिएटर कमांड उभारण्याचा प्लॅन देखील नियोजित आहे.

चीनची दादागिरी वाढतीये; 'अरुणाचल'जवळ वसवली 3 गावे

एका इंग्रजी वृत्ताने दिलेल्या माहितीनुसार मेरीटाइम थिएटर कमांड उभारण्यासाठी आर्मी,  नेव्ही आणि एअरफोर्स या तिन्ही दलांना एकत्रित करण्यात येत आहे. लवकरच अंदमान-निकोबार ट्राय सर्विस कमांडलाही यासोबत जोडले जाणार आहे. सध्याच्या घडीला देशात अंदमान-निकोबार एकमात्र अशी कमांड आहे, ज्यात तिन्ही लष्करी तुकड्यांचा समावेश आहे. परंतु या कमांडचे क्षेत्र हे मर्यादित आहे. 

देशातील अन्य बातम्यांसाठी येथ क्लिक करा

सध्याच्या घडीला चीनमध्ये पाच थिएटर कमांड असून भारत चीनला टक्कर देण्यासाठी सज्ज होतोय. थिएटर कंमाडमध्ये तिन्ही सेना दलाचा बॅकअप आणि एक प्रमुख मुख्यालयाचा समावेश असतो. सुरक्षा यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टिने याची बांधणी केली जाते.    
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India to get five military theatre commands first of all maritime theater command in next year