चिंता संपली! वर्षाअखेरीस आणखी सहा लसी होणार उपलब्ध

चिंता संपली! वर्षाअखेरीस आणखी सहा लसी होणार उपलब्ध
Shailendra Bhojak

कोरोना महामारीनं भारतात हाहा:कार माजवला आहे. सध्या दुसरी लाट आटोक्यात आली असली तरिही धोका मात्र, कायम आहे. त्यातच भारतामध्ये लसीचा तुटवडा पडला आहे. देशात सर्वांसाठी लस उपलब्ध होण्यासाठी सरकारही प्रयत्न करत आहे. सध्या कोवशील्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुटनिक व्ही या तीन लसी भारतामध्ये उपलब्ध आहेत. पुढील काही दिवसांमध्ये भारतात आणखी काही लसी उपलब्ध होणार आहेत. 2021 या वर्षाअखेरीपर्यंत आणखी सहा लसी भारतात येण्याची शक्यता आहे. या लसी भारतात उपलब्ध झाल्यानंतर लसीचांचा तुटवडा संपेल. तसेच लसींच्या किंमतीमध्येही मोठी घट होण्याची शक्यता आहे. पाहूयात कोणत्या आहेत लसी....

कोव्हॅक्स (COVOVAX) -

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एसआयआय) सध्या कोविशील्ड लसीची निर्मिती करत आहे. देशातील 90 टक्केंचं लसीकरण याच लसीनं झालं आहे. सीरम सध्या प्रोटीनयुक्त NVX-CoV2373 या लसीची निर्मिती करत आहे. NVX-CoV2373 ही लस कोव्हॅक्स या नावानं भारतात येणार आहे. कोव्हॅक्सचं उत्पादन सुरु झालं आहे. पुढील काही महिन्यात ही लस भारतामध्ये वापरली जाईल. डिसेंबर 2021 पर्यंत ही लस नागरिकांसाठी उपलब्ध होईल.

HGC019

पुण्यातील Gennova Biopharmaceuticals कंपनीने पहिल्या mRNA कोरोना लसीची निर्मिती केली आहे. याला HGC019 असं नाव देम्यात आलं आहे. गेल्या महिन्यात याची क्लिनिकल चाचणी सुरु झाली आहे. फेज एक ला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. 120 जणांवर क्लिनिकल चाचणी करण्यात आली आहे. डिसेंबर 2021 अथवा जानेवारी 2022 पर्यंत ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल.

चिंता संपली! वर्षाअखेरीस आणखी सहा लसी होणार उपलब्ध
आणखी एक भारतीय लस; किंमत फक्त 110 रुपये

NASAL VACCINE

भारत बायोटेकची nasal vaccine चं सध्या क्लिनिकल ट्रायल सुरु आहे. नाकावाटे दिली जाणारी ही पहिलीच लस आहे. या लसीचं नाव BBV154 असं ठेवण्यात आलं आहे. सध्या या लसीचं पहिल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल सुरु झालं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन सध्या उपलब्ध आहे.

ZyCoV-D

गुजरातमधील Zydus Cadila या कंपनीनं कोरोना लस तयार केली आहे. या लसीचं नाव ZyCoV-D असं आहे. ही DNA व्हॅक्सिन असल्याचं बोललं जात आह. सद्या ही लस प्राथमिक चाचणीमध्ये अडकली आहे. पण वर्षाअखेरपर्यंत ही लस सर्वांसाठी उपलब्ध होईल, असेही सांगितलं जात आहे.

चिंता संपली! वर्षाअखेरीस आणखी सहा लसी होणार उपलब्ध
कोरोनावर आणखी एक औषधं, किंमत ५९,७५० रुपये प्रतिडोस

CORBEVAX

हैदराबाद येथील बायोलॉजिकल ई कंपनीनं Corbevax ही लस विकसीत केली आहे. सध्या या लसीची फेज तीनची क्लिनिकल चाचणी सुरु आहे. केंद्र सरकारनं 30 कोटी डोसची ऑर्डर दिली आहे. असं म्हटले जातेय की, ही जगातील सर्वात स्वस्त लस असेल.

PTX-COVID19-B

हैदराबाद येथील बायोलॉजिकल-ई कंपनी Corbevax या लसीसोबतच mRNA या लसीचं उत्पादन करणार आहे. कॅनडा येथील Therapeutics Holdings या कंपनीसोबत बोलणी सुरु आहेत. सर्वकाही व्यवस्थित झालं तर याचं भारतात उत्पादन सुरु होईल. या लसीचं नाव PTX-COVID19-Bअसं आहे.

JANSSEN

बायोलॉजिकल-ई जॉनसन अॅण्ड जॉनसन कंपनीची JANSSEN कोरोना प्रतिबंधक लस भारतासाठी घेऊन येत आहे. जवळपास 600 मिलियन डोसच्या निर्मितीची ऑर्डर घेतली आहे. जॉनसनच्या लसीला अमेरिकेत याआधीच परवानगी मिळाली आहे. युरेपियन महासंघ, थायलंड आणि दक्षिण आफ्रिकामध्ये या लसीचा वापर केला जात आहे.

ANI

SPUTNIK V

भारतातील सहा कंपन्यामध्ये रशियाच्या SPUTNIK V या कोरोना प्रतिबंधक लसीची निर्मिती होणार आहे. कोव्हिशील्ड आणि कोव्हॅक्सिननंतर भारतात सर्वाधिक वापरली जाणारी SPUTNIK Vही लस होऊ शकते. हेट्रो बायोफार्मा (Hetero Biopharma), ग्लॅन्ड फार्मा (Gland Pharma), Panacea Biotec, Stelis Biopharma, Virchow Biotech आणि सीरम या कंपनीमध्ये रशियाच्या SPUTNIK V या लसीचं उत्पादन होणार आहे. पुढील काही दिवसांत SPUTNIK V या लसीचे कोट्यवधी डोस तयार होतील.

विदेशी लसी -

भारतातील काही लस निर्मिती करणाऱ्या कंपन्या technology transfer द्वारे विदेशी लसीचं उत्पादन करण्याच इच्छुक आहेत. Cipla आणि मोडर्ना यांच्यामध्ये सध्या बोलणी सुरु आहेत. करार झाल्यास Cipla जवळपास एक बिलियन मोडर्ना लसीचं उत्पादन करणार आहे. त्यासोबतच फायझर आणि Wockhardt ही भारतामध्ये लस निर्मिती करण्यास इच्छुक आहे. भारत जगातील सर्वाधिक लस निर्मिती करणारा देश आहे. त्यामुळे जगातील विविध कंपन्या भारतात लस निर्मिती करण्यास रस दाखवत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com