esakal | कोरोनावर आणखी एक औषधं, किंमत ५९,७५० रुपये प्रतिडोस
sakal

बोलून बातमी शोधा

कोरोनावर आणखी एक औषधं, किंमत ५९,७५० रुपये प्रतिडोस

कोरोनावर आणखी एक औषधं, किंमत ५९,७५० रुपये प्रतिडोस

sakal_logo
By
नामदेव कुंभार

चंडीगड : भारतात आज बहुचर्चित रोश ॲटीबॉडी कॉकटेलचा पहिला वापर हरियानातील ८४ वर्षाच्या कोरोनाबाधित ज्येष्ठ नागरिकावर करण्यात आला. सीडीएससीओ म्हणजेच केंद्रीय औषध मानक नियंत्रण संस्थेने काही दिवसांपूर्वी भारतात रोश ॲटीबॉडी कॉकटेलच्या आपत्कालीन वापरास मंजुरी दिली होती. हे औषध कोरोनाविरोधातील लढाईत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असा दावा केला जात आहे. (84 year old haryana man gets roche antibody cocktail first corona patient in india to get this drug)

सीडीएससीओ’ ने भारतात ॲटीबॉडी कॉकटेल हे कासीरिविमाब आणि इमडेविमाब यांना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी दिली आहे. याप्रमाणे हरियानाचे ८४ वर्षीय मोहब्बत सिंह हे रोश ॲटीबॉडी कॉकटेल औषध घेणारे देशातील पहिले कोरोनाबाधित रुग्ण ठरले आहेत. हेच औषध अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना झाल्यावर देण्यात आले होते.

हेही वाचा: खुशखबर! कोरोनावर दोन औषधे विकसित

स्वित्झर्लंडची औषध कंपनी रोश इंडिया आणि सिप्ला यांनी काल भारतात रोशची ॲटीबॉडी कॉकटेल लॉंच केल्याची घोषणा केली होती. त्याची किंमत ५९,७५० हजार रुपये प्रति डोस निश्‍चित करण्यात आली आहे. गंभीर रुग्णास हे औषध देण्यात येणार आहे. गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात मोहब्बत सिंग यांच्यावर पाच दिवसांपासून उपचार सुरू आहेत. काल त्यांना या औषधाचा डोस दिला. हे औषध गंभीर रुग्णाची तब्येत आणखी ढासळण्यापासून, रुग्णालयात दाखल होण्यापासून आणि मृत्यूची जोखीम ७० टक्के कमी करण्यासाठी साह्यभूत ठरते. या औषधाचे सेवन करताच शरिरात वेगाने प्रतिपिंड तयार होतात आणि ते संसर्गाची तीव्रता कमी करतात. त्याचबरोबर शरीरातील कोरोनाची लक्षणांचा कालावधी देखील कमी करतात.

हेही वाचा: कोरोनात औषधांचा काळाबाजार; कशी ओळखाल बनावट औषधं?

लक्षणे आणि मृत्यूदरही होतो कमी

रोश औषधाची दोन ॲटीबॉडी डोस कासीरिविमाब आणि इमडेविमाबची पहिली खेप काल भारतात पोचली. मेदांता रुग्णालयाचे संचालक डॉ. नरेश त्रेहन यांच्या मते, प्लाझ्माबरोबरच कोरोनाच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडिसिव्हिर आणि टोसिलिजुमैब या पेक्षा रोशे औषध खूप वेगळे आहे. रोशचा डोस घेणाऱ्यांना दवाखान्यात दाखल करण्याची शक्यता ८० टक्क्यांनी कमी झाल्याचे संशोधकांनी दावा केला आहे. तसेच काळानुसार कोरोनाची लक्षणे कमी करण्याबरोबरच त्याचा वापर केल्याने मृत्युदरही कमी होत असल्याचे निदर्शनास आले. त्रेहन म्हणाले, की या औषधानंतर रुग्णाच्या शरिरात अंटीबॉडी तयार होते आणि ती तीन ते चार आठवडे राहते. यादरम्यान औषधाचा वापर केल्याने संसर्गाचा परिणाम कमी करण्यास मदत मिळते.