ब्रिटनमध्ये चिंता वाढली, नव्या रूग्णांमध्ये 60 टक्के रूग्ण ओमिक्रॉनचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

omicron

ब्रिटनमध्ये चिंता वाढली, नव्या रूग्णांमध्ये 60 टक्के रूग्ण ओमिक्रॉनचे

लंडन : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट ओमिक्रॉनने (Omicron) संपूर्ण ब्रिटनमध्ये हाहाकार माजवला असून, संसर्ग होणाऱ्यांमध्ये 60 टक्के प्रकरणे ही ओमिक्रॉनचे (Omicron Cases In Britain ) आहेत, अशी माहिती आरोग्य मंत्री साजिद जावेद यांनी दिली आहे. ओमिक्रॉन आतापर्यंत जगातील 89 देशांमध्ये पसरला आहे. ओमिक्रॉनमुळे ब्रिटनमधील रुग्णालयांची स्थिती पुन्हा बिघडू शकते, असा भीती व्यक्त करण्यात येत आहे. (Omicron recorded in 89 countries )

हेही वाचा: लसीकरण पूर्ण झालेल्यांना बूस्टर डोस द्या : अरविंद केजरीवाल

दरम्यान, परिस्थिती झपाट्याने बिघडत असून नागरिकांनी (Covid Protocol) सावध राहवे, असा सल्ला त्यांनी दिला आहे. ब्रिटनमध्ये, एका आठवड्यात सरासरी 73,000 हून अधिक नवीन रूग्ण दररोज नोंदवली जात आहेत. या ठिकाणी शनिवारी 90 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली, त्यापैकी 10 हजारांहून अधिक प्रकरणे ही ओमिक्रॉनची आहेत.

हेही वाचा: PAN Card: तुमचं पॅनकार्ड खरं आहे की खोटे कसं ओळखायचं? जाणून घ्या

रूग्णांमध्ये सातत्याने वाढ

यूकेमध्ये गेल्या एका आठवड्यात 60 टक्के प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. तर या आठवड्यात 111 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, ओमिक्रॉनच्या संसर्गाचा वेग थांबवण्यासाठी यूकेमध्ये ख्रिसमसनंतर दोन आठवड्यांच्या लॉकडाऊन लावण्याचा विचार सरकारतर्फे केला जात आहे. (Government planning to Imposed Lock down In UK)

Web Title: 60 Percent New Infections Are From Omicron In Britain

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..