esakal | कोरोना लढ्यासाठी केंद्राने राज्यांना आतापर्यंत दिले 1827 कोटी
sakal

बोलून बातमी शोधा

 Narendra modi

राज्यांना दिलेला हा निधी इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेजच्या 15 टक्के इतका असून केंद्राकडून मंजूर केला गेला.

कोरोना लढ्यासाठी केंद्राने राज्यांना दिले 1827 कोटी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी केंद्राने राज्यांना कोरोनाविरोधात लढ्यासाठी 1827 कोटी रुपयांचा निधी दिल्याची माहिती सांगितली. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मिळून एकूण 1827.8 कोटी रुपये देण्यात आले. राज्यांना दिलेला हा निधी इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्स पॅकेजच्या 15 टक्के इतका असून केंद्राकडून मंजूर केला गेला. मनसुख मांडवीय यांनी ट्विटरवर याची माहिती देताना म्हटलं की, 1 हजार 827 कोटी रुपयांचा निधी केंद्र सरकारने कोरोना विरोधात लढ्यासाठी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.

देशभरात 31.4 मिलियन लसीच्या डोसचा साठा सध्या राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांकडे असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तसंच देशात 48 कोटी 78 लाख डोस पुरवण्यात आले असून 68 लाख 57 हजार 590 डोस पाठवले जात आहेत. आतापर्यंत वाया गेलेल्या लसींसह 45 कोटी 82 लाख 60 हजार 52 डोस देण्यात आले आहेत.

हेही वाचा: तुमच्यावर मोठी जबाबदारी; PM मोदींचा IPS प्रशिक्षणार्थींशी संवाद

भारतात शुक्रवारी दिवसभरात 41 हजार 649 नवीन रुग्ण सापडले. आतापर्यंत सापडलेल्या एकूण रुग्णांची संख्या 3 कोटी 16 लाख 13 हजार 993 इतकी झाली आहे. गेल्या 24 तासात देशात कोरोनामुळे 593 जणांचा मृत्यू झाला असून एकूण संख्या 4 लाख 23 हजार 810 वर पोहोचली आहे.

आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, देशात शुक्रवारी 17 लाख 76 हजार 315 जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली. तर आतापर्यंत घेण्यात आलेल्या एकूण चाचण्यांची संख्या 46 कोटी 64 लाख 27 हजार 38 इतकी झाली आहे. देशात कोरोनाविरोधातील लसीकरण मोहिमेचा नवीन टप्पा 21 जूनला सुरु झाला आहे. तर देशव्यापी लसीकरण मोहिम 16 जानेवारीला सुरु केली होती.

loading image
go to top