जगात कोरोनावाढीचा सर्वाधिक वेग भारतात

वृत्तसंस्था
बुधवार, 29 जुलै 2020

प्रत्येक देशात शंभराव्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर सात दिवसांच्या अभ्यासात भारतात सुरुवातीला मृत्यूचे प्रमाण जास्त होते. नंतर त्यात घट झाली, पण गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढ झाल्याचे दिसते.

नवी दिल्ली - भारतात कोरोनाव्हायरसची साथ पसरण्याचा वेग जगापेक्षा वाढला आहे, असा निरीक्षण ‘ब्लूमबर्ग’च्या कोरोनाव्हायरस ट्रॅकरने नोंदविले आहे. गेल्या आठवड्यात ही वाढ २० टक्के होती तर रुग्ण संख्या १४ लाखापेक्षा जास्त होती. 

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या ‘अवर वर्ल्ड इन डाटा’ या प्रकल्पातील माहितीनुसार अमेरिका न रशियापेक्षा भारत व ब्राझीलमध्ये चाचण्यांची संख्या कमी आहे.
११.८ - भारत
११.९३ - ब्राझील
१५२.९८ - अमेरिका
१९८.३४ - रशिया
(प्रत्येकी एक हजार व्यक्तींमागे)

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

भारतात रुग्णसंख्येत वाढ
आशियाई देशांचा आढावा घेतल्यास रुग्ण व मृतांच्या संख्येत दररोज वाढ होत असलेल्या काही देशांमध्ये भारताचा समावेश आहे.  प्रत्येक आशियाई देशांमध्ये ५०० पर्यंत रुग्णसंख्या नोंदविली गेली, तेव्हापासून सात दिवसांचा अभ्‍यास केला असता भारतात रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसले. 

मृतांचे प्रमाणही वाढले
प्रत्येक देशात शंभराव्या मृत्यूची नोंद झाल्यानंतर सात दिवसांच्या अभ्यासात भारतात सुरुवातीला मृत्यूचे प्रमाण जास्त होते. नंतर त्यात घट झाली, पण गेल्या आठवड्यापासून पुन्हा वाढ झाल्याचे दिसते.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India has the highest rate of corona growth in the world