भारत हे हिंदू राष्ट्रच - भागवत

सकाळ न्यूज नेटवर्क
Thursday, 3 October 2019

 ‘‘भारत हे शतकानु-शतकांपासून हिंदू राष्ट्र आहे, ही सत्यस्थिती असून, ती अपरिवर्तनीय असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानतो. हे सोडून बाकी सारे, अगदी गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्‌स’सह सर्व देशकालपरिस्थितीनुसार बदलू शकते,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. 

नवी दिल्ली -  ‘‘भारत हे शतकानु-शतकांपासून हिंदू राष्ट्र आहे, ही सत्यस्थिती असून, ती अपरिवर्तनीय असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मानतो. हे सोडून बाकी सारे, अगदी गोळवलकर गुरुजींच्या ‘बंच ऑफ थॉट्‌स’सह सर्व देशकालपरिस्थितीनुसार बदलू शकते,’’ असे प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. 

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर यांच्या ‘द आरएसएस- रोडमॅप ऑफ ट्‌वेंटी फर्स्ट सेंच्युरी’ या पुस्तकाचे प्रकाशन भागवत यांच्या हस्ते झाले.या पुस्तकातील समलैंगिकतेबाबतच्या विचारांनी वादळ उठविले असले तरी, या गटाला संघ वेगळे किंवा टाकाऊ मानत नसल्याची भावना भागवत यांनी व्यक्त केली. पुराणांतही बृहन्नडा, शिखंडीसारखी पात्रे महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आपल्याच समाजाचा भाग असलेल्या समलैंगिकांबाबत वेगळी भावना संघ ठेवत नाही, असे त्यांनी सांगितले.

भागवत म्हणाले, ‘‘संघाबाबतचे गैरसमज असणाऱ्यांनी आधी संघात दोन-तीन वर्षे यावे, त्यांना संघ समजला नाही तरी त्यांचे गैरसमज नक्की दूर होतील. कारण, संघ कोणालाही कधीही संपूर्ण समजलेला नाही. संघ पुस्तकांत  बांधलेला नाही.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: India is a Hindu nation says Bhagwat