
नवी दिल्ली : इराण आणि इस्राईल यांच्यातील युद्धाचा भडका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने रशियाहून कच्च्या तेलाची आयात वाढवली आहे. भारतीय तेल कंपन्या सध्या रशियाकडून प्रतिदिवस २० ते २२ लाख बॅरल कच्च्या तेलाची खरेदी करीत आहेत. मागील दोन वर्षांतील हा उच्चांकी आकडा असल्याचे जागतिक व्यापार विश्लेषक कंपनी ‘केपलर’कडून सांगण्यात आले आहे.