cm yogi adityanath
sakal
'लोकशाहीचा खरा अर्थ आणि तिची मुळे जर कोणाला जाणून घ्यायची असतील, तर त्याने भारताकडून शिकले पाहिजे. भारत केवळ जगातील सर्वात मोठी लोकशाही नसून, ती लोकशाहीची जननी (Mother of Democracy) आहे. वैशाली गणराज्य हे याचे मूर्तिमंत उदाहरण आहे.' असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी केले.
मुख्यमंत्री निवासातील सभागृहात 'हिंदुजा फाउंडेशन'द्वारे प्रकाशित ‘प्रारंभिक उत्तर भारत व इसके सिक्के’ या पुस्तकाचे विमोचन करताना ते बोलत होते. हे पुस्तक भारताचा प्राचीन इतिहास आणि लोकशाही परंपरा पुराव्यांसह जगासमोर मांडणारे एक महत्त्वाचे दस्तऐवज असल्याचे त्यांनी सांगितले.