Friendship Day : इस्त्राईलच्या 'या' आयरन लेडीनं निभावली होती भारताशी पक्की मैत्री

एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये यु्द्ध सुरू होतं आणि दुसरीकडे ४५०० किमी दूर इस्त्राईल देशातील पहिल्या महिला प्रधानमंत्री गोल्डा मेयर या युद्धावर जवळून लक्ष ठेवून होत्या.
Friendship Day
Friendship Dayesakal
Updated on

लहानपणापासून आपल्या जीवनात अनेक मित्र जुळत जातात. आणि काही मात्र त्यातले असे मित्र असतात जे तुमची कठीण काळात साथ देतात. मैत्रीचं नातं जसं एका पती पत्नीत असतं, शाळेतल्या मित्र मैत्रिणींत असतं तसं देशादेशांतही असतं. मैत्री निभावण्यासाठी आपल्या भारताने कायमच पुढाकार घेतला आहे. भारत एकमेव असा देश आहे ज्याची मैत्री इस्त्राईल सोबतही आहे आणि सौदी अरब सोबतही. आज मैत्री दिनानिमित्या आपण असाच मैत्रीपूर्वक किस्सा जाणून घेणार आहोत. (India Israel friendship relation )

हा किस्सा आहे १९७१ चा . एकीकडे भारत आणि पाकिस्तानमध्ये यु्द्ध सुरू होतं आणि दुसरीकडे ४५०० किमी दूर इस्त्राईल देशातील पहिल्या महिला प्रधानमंत्री गोल्डा मेयर या युद्धावर जवळून लक्ष ठेवून होत्या. यूक्रेनची राजधानी कीव मध्ये जन्मलेल्या गोल्डा मेयरला इस्त्राईलची 'आजी' म्हणून ओळखल्या जातं. इस्त्राईलचे पहिले प्रधानमंत्री डेविज बेन गुरियो एकदा म्हणाले होते, त्यांच्या मंत्रीमंडळातील एकटा पुरूष म्हणजे गोल्डा मेयर.

गोल्डा मेयरने भारतापुढे ठेवला होता मैत्रीचा प्रस्ताव

गोल्डा मेयरबद्दल सांगायचं झाल्यास त्या इस्त्राईलच्या पूर्व विदेश मंत्री आणि जगातल्या तिसऱ्या प्रधानमंत्री होत्या. गोल्डा यांनी भारताशी मैत्रीपूर्वक संबंध जपत भारताची मदत केली होती. त्यानंतर भारताने हे संबंध कायम ठेवले. १९७१ च्या युद्धाच्या वेळी भारत आणि इस्त्राईल यांच्या राजनितिक संबंध नव्हते. इस्त्राईलचा मित्र असणारा आणि त्यांच्याशी जवळीक असलेला अमेरिका त्यावेळी पाकिस्तानसोबत होता. मात्र इस्त्राईलने त्यावेळी भारताची मदत करण्याचे ठरवले होते.

Friendship Day
Friendship Day

१९७१ च्या युद्धात भारताला लाभली इस्त्राईलची साथ

त्यावेळच्या इस्त्राईलच्या प्रधानमंत्री गोल्डा मेयरने भारताच्या मदतीला १९७१ च्या युद्धात गुप्त पद्धतीने सैन्य पाठवले होते. अमेरिकेच्या एका पत्रकाराने 'ब्लड टेलिग्राम' या पुस्तकात याबाबतचा उल्लेख केलाय. गोल्डा मेयर यांनी इस्त्राईली शस्त्र विक्रेता श्लोमो जबलुदोविक्सच्या माध्यमातून भारतात काही शस्त्र आणि मोर्टार गुपचुप पाठवले होते. यादरम्यान काही इस्त्राईलचे प्रशिक्षकही भारतात आले होते.

मदत करण्याचे दिले होते आश्वासन

इंदिरा गांधी यांचे चीफ सेक्रेटरी पी एन हक्सर यांनी जेव्हा गोल्डा यांना आणखी शस्त्रांची मागणी केली तेव्हा गोल्डा यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं की आम्ही तुमच्या मदतीसाठी तत्पर असू.

Friendship Day
Friendship Day: मित्र मैत्रिणींना द्यायच्या आहेत खास शुभेच्छा ? मग वाचा Friendship Day Special Quotes

भारताने इस्त्राईल सोबत स्थापित केले औपचारिक संबंध

युद्धात भारताचा विजय झाल्यानंतर पाकिस्तानला त्याची हार मानावी लागली आणि बांग्लादेश उदयास आला. इस्त्राईलने भारताची मदत करत मैत्री निभावली होती. आता वेळ होती भारताची. तब्बल वीस वर्षानंतर १९९२ मध्ये भारताने इस्त्राईलसोबत औपचारिक संबंध प्रस्थापित केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com