
विशाखापट्टणम : खोल समुद्रामध्ये बचाव कार्य करण्यामध्ये सक्षम असणाऱ्या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक निस्तर या नौकेचे आज जलावतरण झाले. तंत्रज्ञान आणि संचलनाच्या दृष्टीने भारतीय नौदलाची क्षमता वाढणार असून, सागरी बचाव कार्य विशेषतः पाणबुडीतील बचावकार्यामध्ये भारत हा एक महत्त्वाचा देश म्हणून समोर येणार आहे.