

Strategic Boost! Bahubali Rocket Launches Key Defense Satellite for Indian Navy
Sakal
श्रीहरीकोटा: भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) नौदलासाठी तयार केलेल्या आतापर्यंतच्या सर्वांत वजनदार ‘सीएमएस-०३’ या ४,४१० किलोच्या दूरसंवाद उपग्रहाचे आज यशस्वी प्रक्षेपण झाले. इस्रोच्या ‘बाहुबली रॉकेट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लाँच व्हेइकल मार्क ३ (एलव्हीएम ३ एम ५) रॉकेटद्वारे श्रीहरिकोटातील सतीश धवन अवकाश केंद्रातून सायंकाळी ५.२६ वाजता उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. हा उपग्रह नियोजित भूस्थिर संक्रमण कक्षेत पोहोचविण्यात आल्याची माहिती ‘इस्रो’ने दिली आहे. या उपग्रहाच्या साह्याने हिंद महासागर प्रदेशात शत्रूंच्या हालचालींवर सूक्ष्म नजर ठेवता येणार आहे.