
नवी दिल्ली : दुग्ध उत्पादनात भारत केवळ आत्मनिर्भरच नाही, तर जगात अव्वल क्रमांकावर आहे. पण विषाणूजन्य ‘खुर आणि तोंड’ रोगामुळे भारताला दुधाची निर्यात करता येत नसल्याचे आज मत्स्यपालन, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्री राजीव रंजन सिंह यांनी राज्यसभेत सांगितले.