INS Mormugao : भारताचा हिंदी महासागरातील दरारा वाढणार! स्वदेशी 'मुरगाव' नौदलला सुपूर्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

INS Mormugao

INS Mormugao : भारताचा हिंदी महासागरातील दरारा वाढणार! स्वदेशी 'मुरगाव' नौदलला सुपूर्द

मुंबई - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थित स्वदेशी बनावटीची मिसाइल डिस्ट्रॉयर 'मुरगाव' आज (१८ डिसेंबर) भारतीय नौदलाला सुपूर्द करण्यात आली. नेव्हल डॉकयार्ड, मुंबई येथे हा कार्यक्रम पार पडला. यामुळे हिंदी महासागरात भारतीय नौदलाचा दरारा वाढणार असून देशाच्या सागरी सीमांची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. (india made destroyer ins mormugao commissioned into indian navy )

यावेळी CDS जनरल अनिल चौहान, नौदलाचे प्रमुख ऍडमिरल आर. हरी कुमार, गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि इतर मान्यवर INS मुरमुगाव, P15B स्टेल्थ-गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयरच्या कमिशनिंग समारंभाला उपस्थित होते.

नौदल प्रमुख अॅडमिरल आर हरी कुमार म्हणाले की, स्वदेशी युद्धनौका बांधण्याच्या इतिहासातील आजचा दिवस एक मैलाचा दगड आहे. आज मुरगाव डिस्ट्रॉयर मिसाईल आज नौदलाला सुपूर्द करण्यात आली आहे. गेल्या दशकात युद्धनौका डिझाइन आणि बांधणी क्षमतेत आम्ही घेतलेल्या प्रचंड कष्टाचेसहे यश असल्याचंही कुमार म्हणाले. शहरांच्या नावाने जहाजांची नावे ठेवण्याची नौदलाची परंपरा आहे, ज्यामुळे जहाज आणि शहरांमध्ये नाळ निर्माण होते, असंही कुमार यांनी नमूद केलं.