esakal | Corona Update: देशात दिवसभरात 3 हजार 998 रुग्णांचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

CORONA

गेल्या 24 तासांत देशात 42 हजार 015 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत आज वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय.

Corona Update: देशात दिवसभरात 3 हजार 998 रुग्णांचा मृत्यू

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- देशातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येमध्ये चढउतार पाहायला मिळत आहे. मंगळवारी कोरोना रुग्णांची संख्या 30 हजार आढळून आली होती. पण, गेल्या 24 तासांत देशात 42 हजार 015 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्येत आज वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 24 तासांत 36 हजार 977 रुग्णांनी कोरोना विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काळजीची गोष्ट म्हणजे गेल्या 24 तासांत 3 हजार 998 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. महाराष्ट्र एकट्याने नव्याने 3 हजार 509 कोरोना मृतांची नोंद केली आहे. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. (india maharashtra corona update today health ministry active cases)

देशातील दररोजचा पॉझिटिव्हिटी रेट 2.27 टक्के आहे. गेल्या सलग 30 दिवसांपासून पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांपेक्षा कमी नोंदला गेला आहे. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे 3 कोटी 12 लाख 16 हजार 337 रुग्ण आढळून आले आहेत, तर 3 कोटी 03 लाख 90 हजार 687 रुग्णांनी कोरोनावर मात केलीये. देशात सध्या कोरोनाचे 4 लाख 07 हजार 170 सक्रिय रुग्ण आहेत. कोरोना विषाणूने आतापर्यंत 4 लाख 18 हजार 480 लोकांचा बळी घेतलाय.

कोरोनावर मात करण्यासाठी देशात 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली. आतापर्यंत देशातील 41 कोटी 54 लाख 72 हजार 455 नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचा किमान एक डोस मिळाला आहे. आतापर्यंत देशातील जवळपास 45 कोटी लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्राची कोरोना आकडेवारी

राज्यात सोमवारी 66 रुग्णांचा मृत्यू झाला होता, त्यात वाढ होऊन मंगळवारी 147 रुग्ण दगावले. मृतांचा एकूण आकडा 1 लाख 30 हजार 753 वर पोहोचला आहे. राज्यात दिवसभरात 6 हजार 910 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 62 लाख 29 हजार 596 झाली आहे. राज्यात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या कमी होऊन 94 हजार 593 पर्यंत खाली आली आहे. मृत्यूचा दर 2.4 वरून 2.09 टक्के इतका झाला आहे.

loading image